लोकमान्य टिळक महाविद्यालयात चार नवे पदव्युत्तर अभ्यासक्रम

0
665

लोकमान्य टिळक महाविद्यालयात चार नवे पदव्युत्तर अभ्यासक्रम

 

 

वणी/यवतमाळ, मनोज नवले 

शिक्षणाची गंगा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी या उदात्त हेतूने पद्मविभूषण लोकनायक बापूजी अणे यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या शिक्षण प्रसारक मंडळा द्वारे संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयांमध्ये संगणक शास्त्र आणि वनस्पती शास्त्र या विज्ञान शाखा मध्ये तसेच समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र या मानव्यविद्या ( कला ) शाखांमध्ये पदव्युत्तर अर्थात एम. ए. आणि एम. एस. सी. अभ्यासक्रमाची महाराष्ट्र शासनाच्या वतीने या वर्षी नव्याने मान्यता प्राप्त झाली आहे.
या महाविद्यालयात यापूर्वीच इंग्रजी, मराठी, इतिहास, रसायनशास्त्र आणि वाणिज्य या पाच विषयात पदव्युत्तर अभ्यासासाठी सुविधा उपलब्ध आहे. तसेच आगामी काळात उर्वरित सर्व विषयांसाठी ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक प्रयत्नशील आहेत.
तालुकास्तरावर तब्बल नऊ विषयात पदव्युत्तर अभ्यासाची सुविधा असणारे हे विद्यापीठातील कदाचित एकमेव महाविद्यालय असावे.
त्याचप्रमाणे इंग्रजी, संस्कृत, अर्थशास्त्र, वाणिज्य, रसायन शास्त्र या विषयात महाविद्यालयाच्या आचार्य पदवी संशोधन केंद्रांना विद्यापीठाची मान्यता प्राप्त आहे हे विशेष उल्लेखनीय.
या नव्याने सुरू होत असलेल्या अभ्यासक्रमासह प्रचलित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here