वणी तालुका ओला दुष्काळ जाहीर करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी
वणी/यवतमाळ, मनोज नवले
वणी तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांमध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात हजारो हेक्टरवरील पिकांची नासाडी झालेली आहे. अति पावसामुळे शेतातील कापसाची बोंडे सोडत आहे. सोयाबीनला कोंब फुटत आहे. तुरीचे नुकसान झाले आहे मागील तीन वर्षांपासून सतत नापिकी असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि अशा परिस्थितीत वणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांनी स्थानिक उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन वणी तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केलेली आहे. निवेदन देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉ. महेंद्र लोढा, जयसिंग गोहोकार, सूर्यकांत खाडे, राजाभाऊ बिलोरिया, रामकृष्ण वैद्य, विजयाताई आगबत्तलवार, सविताताई ठेपाले, मारोती मोवाडे, गजेंद्र काकडे, किशोर ठेंगणे, राजेंद्र जेनेकर, पद्माकर देवाळकर, कमलाकर देवाळकर, सुनील पानघाटे, राजू उपरकर उपस्थित होते.