कोठारी वनक्षेत्रात वनकर्मचाऱ्यांचे कोम्बिंग ऑपरेशन ऑपरेशन

0
1213

कोठारी वनक्षेत्रात वनकर्मचाऱ्यांचे कोम्बिंग ऑपरेशन ऑपरेशन

● जंगलातील मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी उपक्रम।
● मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्याचा प्रयत्न।

 

राज जुनघरे
बल्लारपूर ( चंद्रपूर ) :- मध्यचांदा वनविभाग चंद्रपूर अंतर्गत येणाऱ्या कोठारी वनपरिक्षेत्रात उपवनसंरक्षक अरविंद मुंडे चंद्रपूर यांच्या सुचनेनुसार सहायक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनात व वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे यांच्या नेतृत्वात परसोडी उपवनातील नियत क्षेत्र पाचगाव कक्ष क्र. ५३४ व पाचगाव शेतशीवार, गाव हद्द सिमा, नाला परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.वृक्षतोड , वन्यप्राण्यांची शिकार तस्करी व वनउपजाची तस्करीच्या पार्श्वभूमीवर हे सरचिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
पावसाळा अंतिम टप्यात आहे. हीवाळ्याची चाहुल लागणार आहे. शेतपीके जोमात आहेत. त्यामुळे वन्यप्राणी हे शेताकडे धाव घेतात. व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करतात. त्यावर आळा घालण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करीत असतात. यातुन शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे, तस्करांकडून मौल्यवान वृक्षांची तोड करून तस्करी करण्यात येते. त्यावर आळा घालता यावा. शिकारीच्या घटनांवर नियंत्रण ठेवता यावे. आणि वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून हे सरचिंग ऑपरेशन राबविण्यात आले. नुकतेच महिनाभरापूर्वी पाचगाव येथील काही नागरिकांना वाघाच्या अवयवांची तस्करी करीत असताना बुटिबोरी वनविभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले. त्याचे पळसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. आणि वनविभागात व स्थानिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली. कोठारी क्षेत्रा लगतच्या पोभुर्णा वनक्षेत्रातील भटारी येथुन वाघाच्या अवयवा समवेत आरोपी बुटिबोरी वनविभागाच्या गवसणीला सापडले हे दोन्ही अवयव प्रकरण ताजे असल्याने जंगलाचे व वन्यजीवांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने वनअधिकारी व क्षेत्र सहायक वनकर्मचारी यांची पाचगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्र. ५३४ व पाचगाव जंगल, शेतशिवार, गाव सिमा, पिंजून काढण्यात आले. सदरील वनात वाघ, बिबट, अस्वल, निलगाय व तृणभक्षी प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याकडे जातीने प्राण्यांच्या हालचालींवरनजर ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करण्याचे सर्व कर्मचाऱ्यांना दिशा निर्देश देण्यात आले. गस्ती पथकात वनक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे, क्षेत्र सहायक आर. सी. पेदापल्लीवार, बुरांडे, यांच्या सह वनरक्षक, वनसेवकांसह वनक्षेत्रातील ताफा सहभागी झालेला होता. दर पंधरा दिवसांतून एकदा जंगल क्षेत्रात सरचिंग ऑपरेशन राबविण्यात येणार असून मानवी हस्तक्षेप तपासल्या जाणार असल्याचे वनाधिकारी संदीप लंगडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here