कायर ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात गावकऱ्यात असंतोष
आर्थिक सहकार्य करण्याचे सरपंच नितीन दखने यांचे नागरिकांना आवाहन
वणी/यवतमाळ, मनोज नवले
कायर येथील गावकरी सध्या घाणीच्या साम्राज्यत वास्तव्य करीत आहे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे गावकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे कारण विकासाचे योग्य नियोजन नसल्यामुळे गावातील वार्ड क्रमांक 3 मध्ये मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत व गावकऱ्यांनी अनेकदा निवेदने देऊन त्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही तेव्हा प्रशासनाला गावकरी हतबल झाले आहे. गावातील नाल्या तुडूंब भरून नाल्यातील सांड पाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे त्यामुळे गावात डासाचे प्रमाण वाढून, डेंगू, मलेरिया, ताप, खोकला, यासारख्या अनेक आजारांना गावकऱ्यांना बळी पडावे लागत आहे. तसेच ऐन पावसाळ्याच्या दिवसात अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे . काही लोकांच्या घरातील सांडपाणी वाट सापडेल त्या दिशेने जात असल्याने रस्त्यावर पाण्याचे डबके तयार होऊन व रस्ता उखडून सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने गावकऱ्यांना रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागत आहे इतकेच नव्हे तर शाळेत जाणाऱ्या लहान चिमुकल्या मुलांना ,स्त्रियांना, बायकांना या दुर्गंधी युक्त रस्त्याचा सामना करावा लागत आहे. तसेच गावातील गायी, म्हशी व त्यांचे गोठे रस्त्यावर असून संपूर्ण घाण पाणी येत असल्याने रस्त्यावरून चालणाऱ्या लहान मुलांपासून तर वयोवृद्ध पर्यंत पुरुष व महिला वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. अनेक तक्रारी करून सुध्दा ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तेव्हा गावकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी गावाकऱ्यांनी सरपंच दखने यांना केली आहे. दोन वर्षे कोरोना काळात बाजारपेठा बंद असल्यामुळे येणारी आवक बंद झाली असून तसेच गावकऱ्यांकडे ग्रामपंचायतीचे घर टॅक्स 35 लाख रुपये बाकी असल्याने गावाचा विकास कसा करायचा असा प्रश्न उद्भवत असल्याने विकासात अडसर निर्माण झाला आहे तेव्हा गावकऱ्यांनी घर टॅक्स भरावे तसेच गावाच्या विकासासाठी आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांनी डिसेंबर मध्ये 10 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले, तसेच जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई पावडे यांनी सुध्दा 5 लाख रुपये रस्त्यासाठी व 5 लाख रुपये कब्रास्थान साठी देण्याचे आश्वासन दिले असल्याचे सरपंच नितीन दखने यांनी इम्पॅक्ट 24 ला सांगितले गावातील नागरिकांना सांगितले व गावाकऱ्यांनी ग्रामपंचायतिला आर्थिक सहकार्य करून काम करण्यास सहकार्य करावे असे सरपंच नितीन दखने यांनी सांगितले.