पावसाने घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबियांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आर्थिक मदत
मागील तीन दिवसांपासून चंद्रपूरात सोसाट्याचा वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अश्याच राष्टवादी नगर येथील नुकसानग्रस्त कुटुंबियांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आर्थिक मदत केली आहे. यावेळी यंग चांदा महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा वंदना हातगावकर व आदिवासी समाजाच्या महीला शहर अध्यक्षा वैशाली मेश्राम यांची उपस्थिती होती.
तीन दिवसांपासून चंद्रपूरात वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेकांच्या घरांना शती पोहचली आहे. अनेकांच्या घरावरील टिना उडाल्या असून मातीच्या भिंती कोसळल्या आहेत. याच पावसाचा फटका राष्ट्रवादी नगर येथील रहिवासी शकुंतला नतुजी रघाताटे, जोत्सना गणेश कुळसेंगे, निर्मला जाधव, त्रिवेणी लक्ष्मण जुमनाके यांच्या घरांना बसला असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांना मिळताच त्यांनी सदर कुटूंबियांना आर्थिक मदत करण्याचा सूचना यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना केल्यात त्यानंतर यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पिढीत कुटूंबियांची भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली आहे. तसेच शासनाकडून मिळणारी मदतही लवकर मिळावी याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.