कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका
वणी/यवतमाळ, मनोज नवले
मारेगाव तालुक्यातील बोटोणी घोगुलदरा रस्त्याने कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मारेगाव पोलिसांना मिळाली त्या आधरावर मारेगाव पोलीसांनी टाटा मॅजिक वाहन क्रमांक MH 29 बसा 0094 जनावरे घेवून जात असताना बोटोणी-घोगुलदरा मार्गावर वाहन पकडले.वाहनाची झाडती घेतली असता त्यात १६ हजार रुपये किमतीचे जनावर कोंबून घेऊन जात असल्याचे आढळून आले. या कार्यवाही मध्ये.एकुण २ लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २७ सप्टेंबरच्या रात्रीच्या वेळी करण्यात आली आहे. मारेगाव पोलीसांना गुप्त माहितीच्या आधारे टाटा मॅजिक वाहनाला अडविण्यात आले. दरम्यान वाहनाची पाहणी केली असता २ जनावरे विना परवाना कोंबुन कत्तलीसाठी नेत असतांना दिसून आले.
आरोपीं एजाज बाबा शेख कुरेशी वय वर्ष (३०) पंकज मधुकर राठोड वय वर्ष (३१)मुकेश बळीराम पेंदोर वय वर्षे( २५) कैलास अनंतराव टेकाम वय वर्षे (२५)प्रविण भीमराव येरकाडे वय वर्षे (२७) राजीक मेहमूद कुरेशी वय वर्षे (२०) सर्व रा उमरी या संशायित आरोपी विरुध्द मारेगाव पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण कायदा अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पो. नी. जगदीश मंडलवार यांचे मार्गदशर्नात मारेगाव पोलीस करीत आहे.