उमरखेड च्या दहागाव पुलावरून नागपूर नांदेड हिरकणी बस गेली वाहून…

0
877

उमरखेड च्या दहागाव पुलावरून नागपूर नांदेड हिरकणी बस गेली वाहून…

पुलावर पाणी असताना चालकाने हलगर्जी पणाने बस नेल्याने घडली दुर्घटना

बस मध्ये 10 ते 12 प्रवासी असल्याची माहिती

यवतमाळ, मनोज नवले
देव टाळी त्याला कोण मारी याचाच प्रत्यय आला तो यवतमाळ चे उमरखेड पुसद रस्त्यावर असलेल्या नाल्यावर. यवतमाळ चे उमरखेड पुसद रस्त्यावरून दहेगाव नाल्याला पुलावरून पाणी वाहत असतांना नागपूर डेपोची एसटी बस चालकाने नाल्यावरुन टाकल्याने बस नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. बसमधे 10 ते 12 प्रवासी होते असे समजते. उमरखेड तहसीलदार ठाणेदार सध्या घटनास्थळी आहेत. स्थानिक नागरिक व तालुका टिमच्या सहाय्याने लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दोन लोक झाडावर चढलेले आहेत व दोन लोक एसटीबस च्या टपावर आहेत. त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र जीवित हानी टळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here