वरुर येथे गौण खनिज वाहतुक करणारा हायव्हा जप्त ; राजुरा महसूल विभागाची कारवाई
राजुरा : महसूल विभागाच्या अवैद्य गौण खनिज पथकाने (दि. २७) वरुर येथे केलेल्या कारवाहीत अवैद्य रेती वाहतूक करीत असलेला हायव्हा अवैद्य गौण खनिज वाहन दंड दोन लाख तेहत्तीस हजार तीनशे रुपये आकारण्यात आले आहे.
तालुक्यात छुप्या मार्गाने रेती तस्कर महसूल अधिकाऱ्यांना हुलकावण्या देत रेती तस्करी करीत आहे, महसूल अधिकारी कारवाहीला जाताच जागोजागी रेती तस्करांचे असलेले रखेल माहिती देत असेल्याने कारवाही होत नव्हती मात्र (दि. १८) तहसीलदार हरीश गाडे यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने वरुर (रोड) येथे कारवाही करून रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहे.
वरुर येथे मंडळ अधिकारी एस एम साळवे यांनी महेश देवकते यांच्या मालकीचा हायव्हा क्रमांक एम एच ३४ बी एच ३३१२ हा अवैद्य रेती तस्करी करीत असताना कारवाही केली. यावेळी पथकात तहसीलदार हरीश गाडे, मंडळ अधिकारी निरंजन गोरे, एस साळवे, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, विनोद डोनगावकर, तलाठी व्ही एस गेडाम यांचा सहभाग होता.