भारत बंदला वणी व मारेगाव भारतीय कम्युनिष्ट पक्षाचा जाहीर पाठींबा
वणी (यवतमाळ) मनोज नवले
आज 27 सप्टे. ला दिल्ली येथील शेतकरी कृती समितीने आव्हान केलेल्या भारतबंदला वणी व मारेगाव भारतीय कम्युनिष्ट पक्षाने जाहीर पाठींबा देऊन भव्य मोचाॆ काढुन निवेदन सादर केले. दिल्ली येथे सुरु असले ल्या शेतकरी आंदोलनाला 9 महीने पुणॆ होऊन गेले तरी सरकार शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करणे सोडा साधी बोलनी सुद्धा करीत नाही, उलट केंद्रात सहकार कायदा करून शेतकरींना सरकारी बाजारपेठेतुन व शेती पासुन वंचित करून कंपनीच्या दावणीला बांधण्याचा निर्धार केंद्र सरकार करीत आहे. याविरोधात आज संपुणॆ भारतबंद पुकारण्यात आला आहे. या बंद ला भारतीय कम्युनिष्ट पक्षाने जाहीर पाठींबा दिलेला आहे. आज वणी व मारेगाव येथे भाकपने प्रचंड मोचाॆ काढुन निवेदन सादर केले. वणी येथील मोर्चाचे नेत्रुत्व भाकप जिल्हासचीव काॅ. अनिल घाटे, अनिल हेपट, सुनिल गेडाम, प्रविण रोगे यांनी केले तर मारेगाव येथे बंडु गोलर व अन्य नेत्यांनी केले. मोर्चात भाकप,किसान सभा व अखिल भारतीय आदिवासी महासभा सह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.