लाठी गावात कोविशील्ड लसीचा दुसरा डोज उपलब्ध करून देण्याकरिता ग्रामपंचायत सदस्य यांचे आरोग्य विभागाला निवेदन
वणी (यवतमाळ) मनोज नवले
कोविशील्ड लसीचा पहिला डोज घेणाऱ्या तालुक्यातील लाठी गावातील नागरिकांना दुसरा डोज उपलब्ध करून देण्याकरीत वणी येथील आरोग्य विभागाला ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर यांनी निवेदन दिले. दिनांक 22 जून 2021,3 जुलै 2021,9 ऑगस्ट 2021 अश्या टप्प्या टप्प्याने लाठी गावात लसीकरण सत्र आयोजित केले होते. मात्र 22 जून पासून आज 27 सप्टेंबर म्हणजेच 3 महिन्याचा वर कार्यकाळ होऊन सुद्धा लाठी गावात दुसरा डोज करीता अजूनही लसीकरन सत्र आयोजित केले नाही, असे राहुल खारकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. गावात शेतकरी,शेतमजूर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना वणी शहरात किंवा प्राथमिक केंद्र शिरपूर येथे जाण्यास विविध विवंचनेचा सामना करावा लागतो.
त्यामुळे लाठी गावातील असंख्य नागरिक दुसरा डोज घेण्यापासून वंचित आहे.त्यामुळे लाठी येथील ग्रामस्थांना कोरोना विषाणूपासून संरक्षण मिळेल या उद्देशाने लाठी गावात तात्काळ लसीकरण सत्र आयोजित करावं असे राहुल खारकर यांनी आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे त्यावर आरोग्य अधिकारी यांनी लसीचा तुटवडा आहे त्यामुळे या आठवड्यात कोणत्याही दिवशी लसीकरण सत्र लाठी या गावात लावणार आशी माहिती दिली.