वणी शहरातून भरदिवसा जड वाहतूक…… वाहतूक विभागाकडे दुर्लक्ष ?

0
684

वणी शहरातून भरदिवसा जड वाहतूक…… वाहतूक विभागाकडे दुर्लक्ष ?

 

वणी (यवतमाळ) मनोज नवले 
वणी शहरात उपजिल्हा वाहतूक शाखा ही शहरातील वाहतूक व्यवस्था उत्तम ठेवण्यासाठी आहे. कि सामान्य नागरिकांना त्रास देण्यासाठी……

शहरातील वाहतुक सामान्य माणसाला खूपच डोकेदुखी ठरत आहे. चिकलगाव रेल्वे गेट बंद झाले कि जवळ पास 30 मी.वाहतूक ठप्प राहते. तसेच जड वाहनांच्या भल्या मोठया रांगा राहते मात्र याचा छोट्या वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतो चिखलगाव ते साई मंदिर या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे मात्र याच रस्त्यानी जड वाहन सुसाट वेगाने जात असतात… जेव्हा कि जड वाहनास सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत शहरात जड वाहणास जाण्यास बंदी आहे. मात्र जड वाहने टोल वाचवण्यासाठी पोलिसांच्या समोरून शहरातून जात असतात, मात्र सामान्य जनतेवर दंड ठोकून अस्तित्वाचा दिंडोरा पिटणारी वाहतूक शाखा या ओव्हरलोड वाहतुकीबाबत मुंग गिळून गप्प का असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

 

 

वाहतूक पोलिसांचा ताफा नेहमी टिळक चौकात असतो, पोलीस कार्यवाही करत असतात. मात्र दोन चाकी वाहनावर. टिळक चौक व शिवाजी महाराज चौकात तर आटोवाले नेहमी वाहतूक कोंडी करतात. मात्र वाहतूक पोलीस फक्त बघ्यांची भूमिका घेत असतात. वाहतूक पोलिस हे चारचाकी, तीनचाकी, मोठ्या जड वाहनावर कारवाई करण्याची प्रकरणे खूप कमी असून त्यांची हिम्मत फक्त गरीब सामान्य जनता, शेतकरी या दुचाकी धारकांवर करत असल्याने हा अन्याय किती दिवस जनतेने सहन करावा असा प्रश्न सामान्य नागरिक करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here