एकात्म मानववाद भारतात रुजवणारा नेता पंडित दीनदयाल उपाध्याय – प्रमोद पिपरे
भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी
गडचिरोली, सुखसागर झाडे
मोदी सरकारच्या योजना साकारण्यामागे एकात्म मानवतावाद आहे. पंडीत दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, स्टार्टअप इंडिया, मुद्रा बँक योजना, दिन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, मेक इन इंडिया आदी योजनांमध्येही एकात्मवादाचा विचार केला आहे.
भारतीय जनता पक्षाचा सबका साथ सबका विकास हि घोषणाही एकात्मवादाच्या विचारातून आली आहे.अखंड समाजाचा विचार करणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या चिंतनावर विचार करण्याची देशाला गरज आहे. ६० वर्षापूर्वी मांडलेली एकात्म मानवतावादाची संकल्पना आजही तंतोतंत लागु पडत आहे.म्हणूनच पंडित दीनदयाल उपाध्याय हे भारतात एकात्म मानववाद रुजवणारा नेता होता असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकतांना केले.
शहरातील इंदिरा गांधी चौकातील विश्राम भवनामध्ये भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने भाजपा जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रमोद पिपरे बोलत होते.
पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पर्यंत जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये सेवा साप्ताह कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.वंचित असलेल्या समाजाला केंद्रबिंदु मानून अंतोदयाचा विचार मनात रुजविणाऱ्या अनेक गरजू लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना, वैयक्तिक शौचालय, शेतकरी सन्मान योजना अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजार रुपये, उज्वला योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना गैस वाटप असे अनेक उपक्रम पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्वप्नपूर्ती निमित्ताने समाजातील गरीब, दलित,आदिवासी अशा अंत्योदयी लोकांपर्यंत सेवा सप्ताहाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या योजना लाभार्थ्यांनपर्यंत पोहचवाव्या. असे आवाहनही भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,जी.प. कृषी सभापती रमेश बारसागडे, जी.प.सभापती मीनाताई कोडाप,शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निंबोड,महिला आघाडी जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके,तालुका अध्यक्ष दुर्गा काटवे,शहर महामंत्री तथा नगरसेविका वैष्णवी नैताम,संपर्क प्रमुख जनार्धन साखरे, देवाजी लाटकर,श्याम वाढई,नरेश हजारे,रवी भांडेकर, राजू शेरकी, सोमेश्वर धकाते,पुनम हेमके,गजेंद्र डोंबरे,दिनेश समर्थ,विलास नैताम भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.