हिवरा (मजरा) येथे संततधार पावसामुळे घर कोसळले : जिवीतहानी टळली
एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान
वणी उपविभागात मागील पंधरा दिवसापासून पावसाची सततधार सुरु आहे. यात काल दि. २५ सप्टेंबर रोज शनिवारी रात्रीच्या दरम्यान हिवरा (मजरा) मातीचे घर पावसाचे पाणी मुरल्याने घर कोसळले सुर्दैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र यात एक ते दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्यातील सततधार पाऊस चालूच आहे. शनिवारी सांयकाळच्या दरम्यान हिवरा (मजरा)पाऊस मुसळधार पावसामुळे शंकर सुर्यभान वाघमारे रा.हिवरा(मजरा) मालकीचे असलेले मातीचे घर पावसाचे पाणी मुरून कोसळले सुर्दैवाने जिवीतहानी टळली . असुन एक ते दिड लाख रुपयाचे नुकसान झाले असून संबंधित अधिकारी यांनी पंचनामा करून उचित भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शंकर सुर्यभान वाघमारे यांनी केली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून मुसळधार पावसाने तालुक्यातील अतिवृष्टी होत असुन माणसाबरोबर गुरे ढोरे यांची ही संततधार पाऊसामुळे यातायात होत आहे. शेतीचे येणारे उत्पन्न ही हिरावले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही कापून पिवळा पडत आहे, सोयाबीन आडवा पडून शेंगा सडत आहेत, पिके नेस्तनाबूत होऊन सडत आहेत.