जंटल वुमनचा पुरस्कार पाचवडच्या कु.अर्चना सुतारला बहाल!
अनेकांनी केला त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव!
अमाेल राऊत
सातारा-महाराष्ट्रातील वाई तालुक्यातील पाचवडच्या लोकप्रिय कवयित्रि कु.अर्चना दिलीप सुतार यांनी जगभरात पसरलेल्या विषारी व प्राणघातक काेराेनाच्या कालावधीत आपल्या स्वरचित कवितेच्या माध्यमांतुन प्रबाेधनाचे कार्य केले. दरम्यान त्यांच्या या कार्याची व कामगिरीची दखल घेत (अर्चना सुतार यांना) तामीलनाडु मधील एका अग्रकमी सामाजिक संस्थेने त्यांचा गाैरव करुन त्यांना जंटल वुमन हा पुरस्कार बहाल केला .विशेष म्हणजे त्यांचे हे उल्लेखनिय कार्य बघुन नुकतीच मानगंगा वाहिनीसाठी त्यांची मुलाखत घेण्यांत आली त्यांना साहित्य क्षेत्रात विशेष रुची व आवड असुन सामाजिक क्षेत्रात ही त्यांचे योगदान माेलाचे आहे .अर्चना सुतार यांना जंटल वुमन हा पुरस्कार मिळताच साहित्य क्षेत्रातील अनेक मंडळीने त्यांचे काैतुक व अभिनंदन केले आहे .आज पावेताे त्यांनी अनेक काव्य रचना लिहल्या असुन त्या वर्तमान पत्रासह युट्युब वर प्रसारीत झाल्या आहे .