ग्रामपंचायत वेलतूर तुकूम च्या वतीने नागरिकांना मच्छरदाणीचे वाटप

0
717

ग्रामपंचायत वेलतूर तुकूम च्या वतीने नागरिकांना मच्छरदाणीचे वाटप

 

मच्छरदाणीचे वाटप करताना सरपंचा तथा ग्रामपंचायत पदाधिकारी

चामोर्शी (गडचिरोली)✍️सुखसागर झाडे
चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत वेलतूर तुकूम अंतर्गत १५ व्या वित्त आयोग निधीतून गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने प्रत्येक कुटुंबाला मच्छरदाणी वाटप करण्यात आली.

पावसाळ्यात मच्छरांचे/डासांचे प्रमाण वाढलेले असतात. त्यात गावातील विजेचा लपंडाव सुरू असतो. अशातच मच्छरांचा भस्मासुर तांडव माजवीत असतात. डासांमुळे आरोग्याच्या विभिन्न समस्या उद्भवतात. विविध रोगांची लागन होत असते. मच्छराने चावा घेतला की, नागरिकांची झोप उडाली असते. त्यावेळेस प्रत्येकाला अभिनेता नाना पाटेकरांच्या डायलॉग ची आठवण होते.

या सर्व समस्या वर मात करता यावी व आपल्या नागरिकांना सुदृढ आरोग्य धनसंपदा लाभावी. या हेतुने ग्रामपंचायत अंतर्गत नागरीकांना मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी वेलतुर तुकूम च्या सरपंच संध्या संतोष नायगमकर, उपसरपंच दिगांबर धानोरकर, सदस्या ज्योस्ना कोहपरे, सदस्य देविदास देशमुख, सदस्य संजय चौधरी, सुनीता पाल, शालू कुलसंगे सह सर्व ग्रा. प. सदस्य, वेलतूर तुकूम व वेलतूर रिट येथील समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here