बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अभ्यासीकेतील पुस्तकांसाठी ५ लक्ष रुपये देणार – आ. किशोर जोरगेवार

0
630

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अभ्यासीकेतील पुस्तकांसाठी ५ लक्ष रुपये देणार – आ. किशोर जोरगेवार

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जयंती निमीत्य बाबूपेठ येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे आयुष्यभर झटले. त्यांचे विचार समाजापर्यंत पोहचविण्याची गरज आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी चंद्रपूरचे नाव जगात पोहचवीले. त्यांच्या नावाने सुरु झालेल्या या अभ्यासीकेतून भविष्यातील अधिकारी घडावेत अशी अशा व्यक्त करत येथील अभ्यासीकेतील पुस्तकांसाठी पाच लक्ष रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंती निमीत्य धम्मचक्र स्पोर्टिंग क्लबच्या वतीने बाबूपेठ येथील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अभ्यासीकेत अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आ. उपेंद्र शेंडे, रिब्पीलीकन पक्षाचे नेते कुशाल तेलंग, रामसिंग सोहेल, देशक खोब्रागडे, शहर कॉंग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष रामू तिवारी, जनविकास सेनेचे अध्यक्ष तथा नगर सेवक पप्पू देशमूख, धम्मचक्र स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष तथा नगरसेवक स्नेहल रामटेके, नगर सेविका पूष्पा मुन, आदि मान्यवरांची उपस्थिती होती.

 

 

यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे १८ वर्ष राज्यसभेचे खासदार राहिले. उच्च शिक्षण घेतल्यानंतर समाजासाठी काहीतरी करा हे शब्द त्यांनी मनात पक्के ठेवत स्वतःला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत झोकून दिले. पूढे आंबेडकरी चळवळीचे निष्ठावान नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. अशा मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची जयंती साजरी करत असतांना त्यांनी समाजाला दिलेला विचार आत्मसाद केला पाहिजे. त्यांच्या नावाने सुरु झालेल्या या अभ्यासीकेत अभ्यास करणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांनी येथून पूढे उच्चशिक्षित होऊन जिल्हाचे नाव गौरांकित करावे असे असेही ते यावेळी म्हणाले, या अभ्यासीकेत अपू-या सोइ-सुविधा आहे. त्यामूळे येथील अभ्यासीकेत दोन संगणक देण्यासह पूस्तकांसाठी पाच लक्ष रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही यावेळी त्यांनी केली. समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण घेता यावे या करिता ११ अभ्यासीका तयार करण्याचा माझा संकल्प असून त्यातील चार अभ्यासीकांचे काम सुरु झाले असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रतिमेवर पूष्प अर्पण करत अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here