ब्रिटिशकालीन शाळा जीर्णावस्थेत

0
683

ब्रिटिशकालीन शाळा जीर्णावस्थेत

वणी (यवतमाळ) मनोज नवले

घाणीच्या साम्राज्यातून शाळेची कधी सुटका होईल नागरिक व पालकांत असंतोष नगर पालिका प्रशासनाला लक्ष देण्याची गरज

 

 

 

आजच्या शिवाजी चौकाला पूर्वी गोळीबार चौक म्हणून ओळख होती . या चौकात ब्रिटिशांनी बांधून ठेवलेल्या इमारतीत नगर पालिकेची शाळा क्रमांक दोन या इमारतीत भरायची कारण त्या शाळेला भव्य मैदान होते. त्यामुळे या ठिकाणी विविध शाळांच्या क्रीडा स्पर्धा व्हायच्या आज या ब्रिटीशकालीन इमारतीची दुरवस्था होऊन जीर्णावस्थेत आहे. परंतु याच शाळेच्या पटांगणात नगर पालिकेची हिंदी माध्यमाची शाळा क्रमांक 10 आहे या शाळेत वर्ग 1 ते 4 चे चिमुकले विद्यार्थी ज्ञानार्जन करण्याचे काम करतात ते कसे करीत असतील असा प्रश्न उत्पन्न होते तरीपण येथील शिक्षक मुगगिळून का? असाही प्रश्न उद्भवतो आहे . तेव्हा अत्यन्त गलिच्छ वातावरणात विद्यार्जनाचे कार्य शिक्षक कसा करीत होता . आज तर शाळेचं दृश्य पाहवल्या जात नाही . तरी याकडे नगर पालिका प्रशासनाचे लक्ष नाही केवढी शोकांतिका. आज स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष झाली आहे. तरीही या शाळेला स्वातंत्र्याच्या काळातही मुत्रीघराचा दर्जा प्राप्त झाला आहे. अशा या घाणीच्या साम्राज्यात विद्यार्थ्यांना विद्यार्जन करावे लागते.

 

गेल्या दोन वर्षापासून कोरोना सारख्या महाभयंकर रोगामुळे शाळा सुरू जरी झाल्या नसतील तरीपण या 2021- 22 या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू होऊन शाळेत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती अनिवार्य झाली आहेत . त्यामुळे वणी नगर पालिकेचे शालेय कामकाज सुरू असताना येथील शिक्षक दुर्गंधी युक्त घाणीचे साम्राज्यात कसे काय कामकाज करतात व त्यांना ही अस्वच्छता दिसत नाही का ? येथील कर्मचारी चूप का,? असे एक ना अनेक प्रश्न आहे . ही शाळा गाडे धारकांची व रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांची मुत्रीघर झाली आहे का? असाही प्रश्न नागरिक व पालकांना पडत आहे . या ऐतिहासिक वास्तूमध्ये हजारो विध्यार्थी घडले असून आज रोजी या इमारती ची वाट लागून गेली आहे. या शाळेच्या सभोवताली व्यापारी गाडे बांधून त्यापासून मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा उत्पन्नात नगर पालिका प्रशासन मग्न आहे या प्रशासनाला चिमुकल्यांचे व शिक्षक कर्मचाऱ्यांचे काहीही देणं घेणं नसल्याचे दिसून येत आहे. नगर पालिकेने व्यापार संकुलासाठी मुत्रीघराची व्यवस्था केली नसल्यामुळे गावातील जनता व गाडे धारक लघुशंकेसाठी शाळेचा उपयोग करताना दिसत आहे.

 

शाळेच्या मैदानात कचऱ्याचे ढिगारे, दुर्गंधी डुकरांचा मुक्त संचार ही शाळा म्हणजे सार्वजनिक स्वच्छता गृह बनली आहेत. ज्या शाळेला ऐतिहासिक वारसा आहे तो वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या इमारतीत भरणारी शाळा क्रमांक दोन ही आता जत्रा मैदानावर गेली आहे . त्याही ठिकाणी शाळेतील अडीच तीन लाखाचे शालेय प्रोजेक्टर चोरीला गेले आहे . त्याकडे सुद्धा नगर पालिकेच्या प्रशासनाचे व पदाधिकाऱ्यांचे हेतुपरस्सर दुर्लक्ष आहे. जर विद्यामंदिराचे पावित्र्य कायम ठेवायचे असेल तर नगर पालिका प्रशासनाने व पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. या शाळांत गोरगरिबांची चिमुकली मुले शिक्षण घेत आहे व त्यांच्या जीवितांशी खेळत असल्याचे दिसून येत आहे. आतातर 4 ऑक्टोबर ला शाळेची घंटा वाजणार आहे . तेव्हा नगर पालिका प्रशासनाने जातीने लक्ष घालून घाणीच्या साम्राज्यातून शाळेची सुटका करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आता नवीन रुजू झालेले मुख्याधिकारी अभिजित वायकोस काय करतात याकडे संपूर्ण नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here