ख्रिश्चन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
मूल येथील ख्रिस्ती विकास समितीच्या कार्यक्रमात खासदार बाळू धानोरकर यांची ग्वाही
चंद्रपूर : समाजातील सर्व घटकांची प्रतिष्ठा जपत, त्याचा विकास करण्यासाठी, कुठलाही भेदभाव न करता, त्यांना सक्षम करण्यासाठी तसेच ख्रिश्चन समाजाच्या समृद्धीसाठी कटिबद्ध असून उच्च शिक्षण, आर्थिक विकास, राजकारणात सहभाग, सामाजिक सुरक्षा प्रदान, महिला स्वयंरोजगार, जिल्हास्तरीय वसतिगृह, कब्रस्थान हे प्रश्न मार्गी लावेल अशी ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. ते मूल येथील ख्रिस्ती विकास समितीच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते मूल तालुक्यातील ४० पास्टर च्या सत्कार करण्यात आला.
यावेळी विजय बोरसेजी, काँग्रेस जेष्ठ नेते विनोद दत्तात्रेय, चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, विजय नळे, जॉर्ज कुट्टी, डॉ. हेमंत शर्मा, बसंत सिंग, प्रसन्न शिरवार, राकेश रत्नावार, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, प्रशांत साठे, घनश्याम येरगुडे, राजेंद्र दामले, विजय मेश्राम, अमर थोरात, दिलीप सेंगार, स्मिता मानकर यांची उपस्थिती होती.
ख्रिश्चन समाजातील तरुणांना नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळावे. सुशिक्षित बेरोजगारांच्या उद्योग विकासासाठी मदर तेरेसा यांच्या नावार स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करावी यासाठी मी नेहमी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली. यावेळी मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती समाजातील लोकांची उपस्थिती होती.