वणी येथे आशा स्वयंसेविकांचा केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचे विरोधात देशव्यापी संप
वणी (यवतमाळ) मनोज नवले : केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरणांमुळे देशभरात दिनांक २४ सप्टेंबर रोजी होत असलेल्या देशव्यापी संपनिमीत्त वणी येथे सुद्धा योजना कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन येथील आशा वर्कर यांनी सिटू ह्या कामगार संघटनेच्या बॅनर खाली ह्या संघटनेचे जिल्हाअध्यक्ष कॉ शंकरराव दानव व सचिव कॉ. प्रीती करमणकर यांचे नेतृत्वात वणी उपविभागीय कार्यालयासमोर भव्य धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले.
कोरोणा काळात आशावर्करांनी आपल्या जीवावर उदार होऊन सेवा दिली व अजूनही देत आहेत, ह्या त्यांच्या कार्याकडे डोळेझाक करीत सरकारकडून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, त्यामुळेच दि. २४ सप्टेंबर रोजी आपले काम बंद ठेऊन देशव्यापी संपात भाग घेऊन १)आशा वर्कर ( योजना कर्मचारी ) यांना सरकारी कर्मचाऱ्याच्या दर्जा द्या, २) किमान समान वेतन देण्यात यावे, ३) कोरोना कामाच्या बंद केलेला निधी चालू करावा ४) कामगार विरोधी नवीन कायदे रद्द करावीत, ५) योजना कर्मचाऱ्यांना समान वागणूक देऊन त्यांची प्रताडणा थांबवावी आदी मागण्या ह्या आंदोलनात रेटून धरण्यात आल्या.
ह्या धरणे व निदर्शने आंदोलनात मोठ्या प्रमाणात आशा वर्कर यांनी सहभाग नोंदवून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. सिटू संघटनेचे कॉ. शंकरराव दानव व कॉ. प्रीती करमणकर यांचे नेतृत्वात झालेल्या आंदोलनात प्रामुख्याने कुंदा देहारकर, मेघा बांडे, चंदा मडावी, पल्लवी पिदूरकर, प्रतिभा लांजेवार, अनिता जाधव यांनी सहकार्य केले.