प्रसिध्दीसाठी दिपक सातपुतेंची स्टंटबाजी
● काँग्रेसचा पलटवार
● मारहाण झालेला युवक निघाला सातपुतेचाच कार्यकर्ता
गोंडपिपरी : स्वार्थासाठी गावातील बेरोजगार कार्यकर्त्यांचा वापर करायचा आणि स्वतः मोठ व्हायच.एकदा आपले काम संपले की,त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचे.आणि उलट जबाब दिला किंवा न्याय व हक्काच्या गोष्ट केल्या तर मुस्कटदाबी करायची.वेळप्रसंगी पोलिसांत तक्रार द्यायची.कार्यकर्त्यांच्या मदतीने बेदम मारहान करायची,असे धोरण तालुक्यातील सोनापूर(देश.)येथिल असलेले भाजपचे माजी पंचायत समिती सभापती तथा विद्यामान पं.स.सदस्य दिपक सातपूते यांनी अवलंबीले आहे.यामूळे राज्याच्या सिमेवर वसलेल्या सोनापूर गावच्या नागरिकांचे “सोनेरी दिवस” आता संपले आहेत.सद्या हे गाव दिपक सातपूते यांच्या दहशतीत असल्याने गावकरी भयभित असल्याचा आरोप गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.अश्यातच सद्यास्थितीत चर्चेत असलेले विजय येवले मारहाण प्रकरणाशी काँग्रेसचा तिळमात्र संबंध नाही.मात्र आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका लक्षात घेता गेल्या अनेक दिवसांपासून भाजपात कोंडित सापडून प्रसिद्धीपासून दूर असलेले दिपक सातपूते या प्रकरणाच्या आडून “पब्लिसिटी स्टंट” करीत असल्याची टिका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.ते आज(दि.२३)गोंडपिपरीत तालुका काँग्रेस कमेटीद्वारा आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्याच्या सिमेवरील सोनापूर(देश.) गावातील मारहाण प्रकरणावरुन सद्या भाजप आणि काँग्रेस आमणेसामणे आली आहे. सोनापूर(देश.)येथिल विजय येवले नामक युवकाने माजी सभापती आणि विद्यमान पंचायत समिती सदस्य दिपक सातपूते आणि सोनापूर गावच्या प्रथम नागरिक जया सातपूते या दाम्पत्यांना त्यांचाच कार्यकर्ता या नात्याने काम मागण्याच्या हेतूने घर गाठले.मात्र काम देण्याएवजी कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी बेद्दम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देल्याचा आरोप पत्रपरिषदेसह पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारित विजय येवले यांनी केला.मात्र लागलीच दिपक सातपूते यांनी पत्रपरिषदेत आपली बाजू ठेवली.विजय येवले यांनी लावलेले आरोप बिनबूडाचे असून आपण मारहाण केलीच नसल्याची भूमीका मांडली.एवढेच नाही तर मला बदनाम करण्याचा प्रयत्न राजकीय विरोधकांकडून होत असल्याचा आरोप केला.आणि थेट काँग्रेसवर निशाना साधला.सोनापूर गावची प्रगती विरोधकांना खूनावत आहे.यामूळे माझ्या विरोधकांकडून असे प्रयत्न चालविले जात आहेत. एवढेच नाही तर याचे सुत्र राजूरा येथून हलविले जात असल्याचा आरोपही केला.यामूळे संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रकरणात उडी घेतली असून आता भाजप आणि काँग्रेस आमणेसामणे उभी ठाकली आहे.आज (दि.२३) गोंडपिपरीत तालुका काँग्रेस कमेटीद्वारा पत्रकार परिषद घेत दिपक सातपूते यांचा चांगलाच समाचार घेतला.विजय येवले मारहाण प्रकरणाशी काँग्रेसचा तिळमात्र संबंध नाही.मात्र आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका लक्षात घेता गेल्या अनेक दिवसांपासून भाजपात प्रसिद्धीपासून दूरावलेले दिपक सातपूते या प्रकरणाच्या आडून “पब्लिसिटी स्टंट” करीत असल्याची टिका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.एवढेच नाही तर जिल्हा परिषदेत असलेल्या भाजपच्या सत्तेच्या गैरवापर करत गाव “स्मार्ट”करवून घेतले.मात्र याची चौकशी केल्यास पूरती पोलखोल होणार आहे.मोठे घबाडही समोर येणार असल्याचे सुतोवाच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.सोनापूरातील सामाजिक स्वास्थ खराब झाले असून गावकरी भयभित असल्याचे मत काँग्रेस पदाधिऱ्यांनी मांडत चिंता व्यक्त केली आहे.मात्र काँग्रेसवर विनाकारण केलेले आरोप आम्ही या समोर खपऊन घेणार नसल्याचा ईरादाही बुलंद केला. यावेळी पत्रकार परिषदेला तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तुकाराम झाडे,बाजार समितीचे उपसभापती अशोक रेचनकर, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष मनोज नागापूरे, आत्माचे अध्यक्ष नामदेव सांगडे, पोडसाचे सरपंच देविदास सातपूते, लाठीचे उपसरपंच साईनाथ कोडापे, दरुरचे उपसरपंच बालाजी चनकापूरे आदिंची उपस्थिती होती.