कॅन्सर ग्रस्त युग ला युवा सेनेने केली मदत
वणी (यवतमाळ), मनोज नवले
रश्मी उद्धव ठाकरे व युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांचे वाढदिवसा निमित्त युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे व शिवासेना शहर प्रमुख राजू तुरानकर यांचे मार्फत कर्करोग ग्रस्त युगला मदत करण्यात आली.
वणी तालुक्यातील शिंदोला या गावातील युग कैलास मालेकर याला कॅन्सर या आजाराने ग्रासलेले आहेत. तो आता मृत्युंशी झुंझं देत आहे. युगचे वडील हे भूमीहीन असून त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. त्यांना आलेल्या संकटावर मात करण्यासाठी नागपूर या मोठया शहरांत मुलावर उपचार सुरु आहे.
मात्र औषध आजारावर खर्च आणि प्रवास हा खर्च आवाक्या बाहेर असल्याने त्यांना माणुसकी या नात्याने सरळ हाताने मदत करणे फार गरजेचे आहे. याच सामाजिक जाणीवेतून एक हात मदतीचा पुढे करून युवासेनेचे उपाजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे व शिवासेना शहर प्रमुख राजू तुरानकर यांनी रश्मी उद्धव ठाकरे व युवासेना सचिव वरून सरदेसाई यांचे वाढदिवसाचे औचीत्य साधत युग चे वडील यांना आर्थिक मदत केली. सामाजिक भावनेतून मदत करण्याचे आवाहन वणीकर जनतेला केले आहे. यावेळी शिवसेना उपाजिल्हाप्रमुख संजय निखाडे, उपाजिल्हाप्रमुख दीपक कोकास तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.