“ई-पिक पाहणी” अॕपच्या जनजागृतीसाठी करंजीत आटोपली कार्यशाळा
नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
गोंडपिपरी, सुरज माडुरवार
शेतकऱ्यांकडून “ई-पिक पाहणी” अॕपच्या मदतीने शेतातील पिक पेऱ्यांची नोंदणी युध्दपातळीवर सुरु आहे.मात्र ही नोंदणी करतांना ग्रामीण भागातील अल्पभूधारक गरिब,गरजू शेतकऱ्यांची पंचायत होत आहे.शेतकऱ्यांकडे असलेल्या मोबाईल फोनला “रेंज” राहत नसल्यामूळे शासनाने केलेला “चेंज” बळीराज्यासाठी चांगलीच डोकेदूखी ठरु पाहत आहे.यामूळे तालुक्यातील करंजी गावातील शेतकऱ्यांना आॕनलाईन नोंदणीसाठी मार्गदर्शन होईल या हेतूने येथिल ग्रा.पं.सदस्य समीर निमगडे यांनी पुढाकार घेत गावात शेतकरी सभेचे आयोजन केले. यावेळी शेतकऱ्यांसह, युवकवर्गांना आॕनलाईन नोंदणीबाबत माहिती
देण्यात आली.
सर्वत्र “ई-पिक पाहणी” अॕपच्या माध्यमातून पिक पेऱ्यांची आॕनलाईन नोदणी करतांना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अश्यावेळी शासनाकडून म्हणावी तशी जाणिवजागृती होतांना दिसत नाही.अश्यातच कोरोनाचे सावट असतांना शेतकऱ्यांवर कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट,सोबतच ओला व सुखा दुष्काळामूळे ओढावणारी भिषण परिस्थिती यामूळे शेतकरी हवालदील होत असतो.अशी पाश्वभूमी असतांना “ई-पिक पाहणी” अॕप्सच्या माध्यमातून नोंदणी करणे शेतकऱ्यांना डोकेदूखी ठरली आहे.परिणामी गावातील शेतकऱ्यांना नोंदणी करतांना सोईचे होईल या हेतूने मंगळवारी करंजी गावात आॕनलाईन नोंदणी करतांना येणाऱ्या अडचणीवर कार्यशाळा पार पडली.सदर शेतकरी सभेत गावातील शेतकऱ्यांसह युवक वर्गाला आॕनलाईन करावयाच्या नोंदणीबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी करंजीच्या सरपंच सरिता पेटकर,कृषी सहाय्यक गोपाल राठोड,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडूरवार, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत दुर्गे, ग्रा,पं, सदस्य संगिता निमगडे,जानवी तेल्कापल्लीवार, शितल वाढई, निखिल बामणे आदिसह करंजी, जोगापूर आणि धानापूर येथिल शेतकऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान तालुका कृषी विभागाअंतर्गत असलेल्या विविध योजनांची माहिती देखिल देण्यात आली. यानंतर शेतीच्या बांधावर जात प्रत्यक्ष नोंदणीद्वारे प्रात्यक्षिक समजावून सांगण्यात आले. यामूळे उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.