वणी तालुक्यासह मारेगाव व झरी तालुक्याला पाण्याने झोडपले
परतीच्या वाटेवर असलेल्या पावसाच्या रौद्र रुपामुळे शेत पिकाची नासाडी…!
वणी (यवतमाळ), मनोज नवले
वणी विभागातील वणी, मारेगाव आणि झरी या तिन्ही तालुक्यातील शेकडो गावांना गेल्या दोन दिवसांपासून सारख्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे झोडपून काढले आहेत. वणी विभागात पोळा या सणात पावसाची झळ लागल्यापासून गणपती विसर्जन सुद्धा होऊन संततधार पावसाचा जोर कायमच आहे आज रोजी सुद्धा ढगाळ वातावरणात पावसाच्या सरी बरसत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची वाट लावून जाते की काय अशी भीती आता उत्पन्न झाली आहे. आज सकाळ पासून वणी, मारेगाव व झरी तालुक्यात पावसाला सुरुवात झाली असून ढाकोरी बोरी येथून जाणारी पैंनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे, निर्गुडेला, विदर्भा नदीला तसेच मोठ्या नाल्याना पाणी असल्यामुळे पुराचे रूप धारण झाले आहे तसेच वर्धा नदी सुद्धा दुथडी भरून वाहत आहे. असाच जर संततधार पाऊस पडत राहला तर नदी-नाल्याना पूर येऊन तसेच नदी काठावरील गावांनी सतर्क असण्याची गरज आहे. कारण रिमझिम पाऊस कोसळत आहे.
वणी उपविभागातील नवरगाव धरण फुल्ल असून बंधारे, तलाव सुद्धा जवळपास आले आहे. मंगळवार रोजी वणी तालुक्यात ७५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती कारण मागील वर्षीच्या तुलनेत हा पाऊसअधिक आहे. त्यामुळे असाच जर पाऊस राहला तर निर्गुडेच्या पुराणे मार्ग बंद होण्याची दाट शक्यता आहे.