ठेकेदाराच्या मुजोरीमुळे कामगारांवर उपासमारीची वेळ

0
1137

ठेकेदाराच्या मुजोरीमुळे कामगारांवर उपासमारीची वेळ

कोरपना : वनोजा येथील पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी येथ विविध कार्य करीत असलेले कामगारांचे तब्बल सहा महिन्याचे वेतन थकीत असून जवळपास 50 ते 55 कामगार हे सदर कंपनीत कामावर असून स्थानिक 20 व बाहेरील 30 ते 35 असे कामगार आहेत, अंदाजित थकित रक्कम 30 ते 35 लाख एवढी आहे. कामगार सतत वेतनबाबत कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरला जाब विचारला असता अशी उत्तरे मिळतात कंपनीच्या परिसरात कॅम्पात राहात असलेल्या कामगारांची लाईट कपात करण्यात येईल, पाण्याचा पुरवठा बंद करण्यात येईल, सदर माहिती ही दि. 16/09 /2021 रोजी युवा स्वाभिमान पार्टीचे तालुका अध्यक्ष मोहब्बत खान यांना मिळताच त्यांनी सर्व कामगारांना व प्रोजेक्ट मॅनेजरला पोलीस स्टेशन कोरपना येथे बोलावून कामगारांचा थकित वेतन देण्याकरिता सांगितले पोलीस स्टेशन येथे ही मॅनेजरची मुजोरी थांबली नसून थकित वेतन देण्यास नकार दिला मोहब्बत खान सदर बाब युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांना दिली असता दि. 18/09/ 2021 रोजी स्वतः जिल्हाध्यक्ष यांनी कंपनीच्या कॅम्पात येऊन कामगारांशी चर्चा करीत येत्या आठ दिवसात थकित वेतन देण्याकरिता मॅनेजर शी बोलले. महाराष्ट्र कामगार कायद्यात सहा महिन्याचे वेतन थकित ठेवण्याची कुठलीच तरतुद नसून देखील हे तेथील मॅनेजरच्या मनमानीमुळे सुरु आहे, सदर कंपनीचे मालक आंध्रप्रदेश येथील खासदार असून हे एका खासदाराकडून मुळातच अपेक्षित नाही. कामगारांची पिळवणूक होत असून, त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

 

 

कामगारांच्या परिश्रमातून कंपनीचा तसेच संस्थेचा विकास होत असतो. कामगार हा कंपनीचा अविभाज्य घटक असून त्याच्या कष्टाचा मोबदला व आवश्यक सुविधा पुरविणे हे कंपनीचे काम आहे. कामगार कायद्यान्वये तसे सर्व कामगार आस्थापनांना बंधनकारक आहे.

 

 

काही ठेकेदारांच्या मुजोरपणामुळे कामगारांचे वेतन वेळेवर दिले जात नाही. तसेच कामगारांना पूर्वसूचना न देता कामावरून काढले जात आहे. करिता कामगारांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी येथील कामगारांनी पगाराची मागणी केली असता, शिवीगाळ केली जाते. ही बाब पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधितांविरोधात पोलीस स्टेशन कोरपना येथे लेखी तक्रार देण्यात आलेली आहे. कामगारांच्या हक्कासाठी “युवा स्वाभिमान पार्टीचे” तालुका अध्यक्ष मोहब्बत खान यांच्या माध्यमातून लढा उभारून कोणत्याही कामगारावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. उद्योजक व कामगार एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. दोघांच्या सहकार्यातून उद्योजक वाढतात. मूठभर लोकांच्या चुकीच्या धोरणामुळे कामगार व उद्योजकांमध्ये संघर्ष निर्माण होऊन बदनामी होत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here