तोहोगावच्या विकासासाठी पालकमंत्र्यांनी दिले आश्वासन

0
999

तोहोगावच्या विकासासाठी पालकमंत्र्यांनी दिले आश्वासन

विकासकामांसाठी पदाधिकाऱ्यांचे साकडे

 

 

तालुका प्रतिनिधी, राज जुनघरे
बल्लारपूर :- गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामे करून घेण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केलेला असुन विकास कामे मंजूर करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले यांना प्रत्यक्ष भेटून साखळे घातले आहे.

 

 

तोहोगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असुन गावातील रस्ते बांधकाम, होतकरु युवकांना सुदरुढ आरोग्यासाठी प्रेरक ठरावी अशी व्यायाम शाळा, ओपन जिम आदी विविध मागण्या घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी वडेट्टीवार यांनी तोहोगावकरांच्या मागण्यांना प्रतिसाद देत विकास कामे मंजूर करण्याचे आश्वासन दिले. तद्वतच जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले व समाज कल्याण सभापती सुभाष कासनगोटुवार यांना निवेदन देऊन जिल्हा परिषद स्तरावर विकास कामे मंजूर करण्यात यावी अशी मागणी केली. त्यांचे कुठुन तोहोगावच्या विकासासाठी आश्वासन दिले आहे. यावेळी ग्रामपंचायत सरपंच अमावस्या ताडे, उपसरपंच शुभांगी मोरे, सदस्य मदन खामनकर, अनिता नगरकर, आनंद रामटेके, बबन मोरे, क्रिशना मडावी, श्यामराव नारेलवार यांनी दिलेल्या निवेनाला प्रतिसाद देत समक्ष भेटी दरम्यान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी गावाच्या विकासासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here