ग्रामसेवकावर कारवाई करा…!
संदीप पौरकर यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्याकडे सादर केले तक्रारीचे निवेदन
गोंडपीपरी/चंद्रपूर : गोंडपिपरी येथील ग्रामपंचायत वढोली येथे गेल्या दोन वर्षांपासून विनोद झिले हे ग्रामसेवक पदावर कार्यरत आहेत. तेव्हापासून त्यांनी कुठल्याही शासकीय योजनेची माहिती गावकर्याकडे देत नाहीत आणि गावकऱ्यांशी उद्धटपणे वागतात. ग्रामपंचायत चे कुठलेही कामे ई टेंडर नं काढता ते आपल्या मार्जितील लोकांनाच देतात. कुठल्याही योजनेच्या लाभार्थ्यांना ते धनादेश नं देता आपल्या मर्जीने खात्यातून पैसे काढून लाभार्थ्यांना रोख रकम देतात त्यामुळे प्रशासनाकडून चौकशी केल्यास खूप मोठा भ्रष्टाचार हाती लागू शकते. स्वछता, पाणीपुरवठा यासारख्या गावातील मूलभूत समस्या कडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे गावातील नागरिकांकडून त्यांच्याविषयीं असंतोष पसरला आहे. त्यामुळे त्यांना बडतर्फ करून लवकरात लवकर दुसऱ्या ग्रामसेवक ला वढोली ग्रामपंचायत मध्ये पदभार द्यावा अशी मागणी गावकर्याकडून करण्यात येत आहे.
या सर्व बाबींचा आढावा घेऊन ग्रामपंचायत सद्यश संदीप पौरकार यांनी आज 20-09-2021 ला असंख्य गावकऱ्यांना घेऊन गोंडपिपरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांना तक्रारीचे निवेदन दिले आहे येत्या 10 दिवसात संबंधित ग्रामसेवक यांना बडतर्फ केले नाही तर मोठा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा संदीप पौरकार यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे यावेळी गोंडपिपरी चे माजी नागराध्यक्ष संजय झाडें, गणेश दहाडे, शा. व्य. समितीचे अध्यक्ष संदीप लाटकर ग्रामपंचायत सदस्य संदीप पौरकार, यादव भोयर, राहुल आभारे, रुपेश नामेवार, दयाराम मेश्राम, साईनाथ भोयर, सचिन कोहपरे, मारोती भोयर, विकास भोयर, रमेश भोयर, यासंह वढोली येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.