बेंबळाच्या कामामुळे व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दया
वणी (यवतमाळ), मनोज नवले : बेंबळा प्रकल्प कालव्याच्या कामामुळे तसेच अतिवृष्टीमुळे पिकांची अतोनाथ नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतातील सर्व व पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने तहसीलदार मारेगाव यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील कुंभा- मार्डी परिसरात बेंबडा प्रकल्प कालवा अंतर्गत पाटसऱ्याचे काम गेल्या अनेक वर्षा पासून चालु आहे. यात बेंबडा विभागाचे अभियंता व ठेकेदार हे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, त्यांना माहित न करता, शेतातुन कालव्याच्या पाटसऱ्याचे काम करीत आहे.यामुळे कुंभा- मार्डी परिसरातील अनेक शेतकरी बांधवांच्यापिकांचे नुकसान झाले आहे.तसेच तालुक्यात पडत असलेल्या संततधार पावसाने नदी नाल्या काठावरील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरुन पिकांची अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे कुंभा – मार्डी परिसरातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे शेतातील तत्काळ सर्वे व पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिलेल्या निवेदनातून शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी उपसभापती तथा सेनेचे तालुका प्रमुख संजय आवारी, युवा सेनेचे तालुका प्रमुख मयुर ठाकरे, गजानन ठाकरे, पंकज डुकरे,आशिष घोटेकर, विवेक चौधरी, गजानन आदेवार, प्रवीण नाने, अनिल राऊत,विनोद ठावरी, जनार्दन गाडगे आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.