प्राणवायू मुळे नागरिक हैराण
कोरपना , गडचांदूर येथील जुनी माणिकगड सिमेंट कंपनी व सध्याची अल्ट्राटेक सिमेंट कंपनी फार मोठ्या प्रमाणात वायु प्रदूषण करीत असून कंपनी प्रशासनाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळल्या जात आहे. या कंपनीच्या वायुप्रदूषणामुळे गडचांदुरातील व परिसरातील नागरिकांच्या सरासरी आयुर्मानात घट झालेली आहे. तसेच वायू प्रदूषणामुळे येथील नागरिकांना विविध रोगांनी ग्रासलेले आहे. या गंभीर बाबीची कोणीही दखल घेताना दिसत नाही. आज पहाटे ६.३० वाजताच्या दरम्यान कंपनी मधून फार मोठ्या प्रमाणात धूर बाहेर सोडण्यात येत असल्याचा फोटो ई-मेल द्वारे आपणाकडे पाठविण्यात येत आहे.
कंपनी व्यवस्थापन व चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळ या गंभीर बाबीला जबाबदार असून मुद्दाम याकडे ते दुर्लक्ष करतात. त्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा काय स्वार्थ दडलेला आहे ते ठाऊक नाही. त्यामुळे आपण अल्ट्राटेक सिमेंट कंपनी गडचांदूरवर पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करीत असल्याबाबत तात्काळ कारवाई करावी ही विनंती.
आशिष देरकर, सामान्य नागरिक
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ईमेलद्वारे आज केले तक्रार