मुल-पोंभुर्णा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा कांग्रेस पक्षामध्ये प्रवेश

0
1100

मुल-पोंभुर्णा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा कांग्रेस पक्षामध्ये प्रवेश

 

                  नुकताच सेलिब्रेशन हाॅल भद्रावती येथे वरोरा-भद्रावती विधानसभा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार व विविध पक्षातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांचा कांग्रेस पक्षामध्ये प्रवेश व भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. 

       सदर कार्यक्रमाला ना. सुनिल केदार मंत्री पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण, ना. विजय वड्डेटीवार पालकमंत्री चंद्रपुर .बाळुभाऊ धानोरकर खासदार मान. सुभाष धोटे आमदार राजुरा विधानसभा मतदारसंघ, अभिजीत वंजारी आमदार, अविनाश वारजुरकर माजी आमदार, मान. प्रकाश देवतळे जिल्हाध्यक्ष कांग्रेस कमेटी चंद्रपूर तथा कार्यक्रमाचे आयोजक मान. प्रतिभा धानोरकर आमदार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. 

       सदर कार्यक्रमात नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य तथा हजारोंच्या संख्येने महिला-पुरुष उपस्थित होते. याचबरोबर अनेक पक्षात काम करून निरस्त असलेल्या कार्यकर्त्यांनी कांग्रेसची मुठ-बांधणी हाती स्विकारली.आणि आज हजारोंच्या संख्येने कांग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. 

               या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये बल्लारपूर-72 विधानसभा मतदार क्षेत्रातील आमदाराचे नेतृत्व करणार्ऱ्यांच्या तालमीत असणारे कार्यकर्ते प्रचंड नाराजी अस्वस्थता असलेले, जिवाचे रान करून काहीही हाती न आल्याने अखेर बाळुभाऊ धानोरकर खासदार यांच्या नेतृत्वाखाली आणि ना. विजय वड्डेटीवार पालकमंत्री चंद्रपुर यांच्या विकास कामाच्या झंझावातासमोर विनोद अहिरकर यांच्या माध्यमातून आज मुल-पोंभुर्णा तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी कांग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला.

         यामध्ये पोंभुर्णा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे बापु चिंचोलकर माजी सभापती पं. स. पोंभुर्णा, देवरावजी कडते ग्रा. पं. सदस्य, मुल तालुका भाजपा सचिव कालिदास वरगंटीवार,मदन चंद्रावार,मुर्लीधर लोडेल्लीवार तं मु अध्यक्ष जुनासुर्ला , महेंद्र घोनमोडे, नरेंद्र देशमुख, मनोज बेले, पोचुजी येग्गेवार, जगदीश मडावी,दौलत कडते, हेमंत पौरकार, विलास शेमले, प्रशांत वाकडे, गोविंदा पौरकार, प्रविण दुर्गे, पंकज तावाडे, गुरुदास दुर्गे, कैलास देवगडे नवेगाव मोरे, मान. पांडुरंगजी राऊत, भारत गुडी, विलास राऊत, दिलीप शिंदे, संदीप कुळमेथे चिमनाहेटी, मान. शांताराम पाल, बुद्धभुषण दहिवले, यादव रामटेके, किशोर वाकुडकर, स्वप्नील राऊत, राजन भडके, विनोद व्याहाडकर, शुभम येनगंटीवार, जयदेव ईडगिलवार, देवानंद रामटेके दिघोरी अशा मुख्य मातब्बर लोकांच्या भाजपाच्या काम करणाऱ्या लोकांनी कांग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणे पसंत केले. याठिकाणी आज त्यांचा कांग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला. 

                            ना. विजय वड्डेटीवार पालकमंत्री यांनी ज्या बाहेरील पक्षाच्या लोकांनी कांग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्या सर्वांचा सत्कार केला. व त्यांना कांग्रेस पक्षामध्ये सन्मानाची जागा देण्याची ग्वाही दिली. बाळुभाऊ धानोरकर यांनी खासदारांच्या माध्यमातून जे काही मदत व कार्यकर्त्यांचा माध्यमातून गाव विकास करण्याची हमी दिली. आणि अशा पद्धतीने भाजपाचा बाल्लेकिल्ला असलेल्या बल्लारपूर- 72 मतदारसंघाला खिंडार पडायला प्रथम सुरुवात भद्रावती येथील सेलिब्रेशन हाॅल मध्ये झालेल्या मेळाव्यात पहायला मिळाली. आणि या कार्यक्रमामध्ये जे काही कार्यकर्ते प्रवेश केले हि केवळ निजलील होती झाॅकी पुन्हा बाकी असलेले चित्र आपल्याला बल्लारपूर- 72 मतदारसंघात पहायला मिळणार आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here