न.प. च्या वाटर फिल्टरच्या पाण्यात निघतात जंतू ?

0
809

न.प. च्या वाटर फिल्टरच्या पाण्यात निघतात जंतू ?

न.प. चा जनतेच्या आरोग्याशी खेळ ; जनतेत आक्रोश

कोरपना (ता.प्र.)प्रवीण मेश्राम : तालुक्यातील गडचांदूर शहरातील प्रत्येक प्रभागांत नगर परीषदेने मोठा गाजावाजा करीत वाटर फिल्टर बसवून जनतेस शुध्द पाणी मिळणार म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतली. पण नव्याचे नव दिवस या म्हणी प्रमाणे वाटर फिल्टरचा बार फुसका निघाला. कारण प्रभाग क्र. एक मधिल वाटर फिल्टर मधून जंतू निघत आहे त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी निगडीत प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. दिनांक 13 /8 /2021 ला एका अज्ञात व्यक्तीने एटीएम मशीनची तोडफोड केली व तिथला पाईप पण तोडून टाकला जर येथील येथे कर्मचारी नेमले आहेत. मोठ्या थाटामाटात बर्फी पेढे वाटून या एटीएम मशीनचे शुभारंभ करण्यात आला. पण आज या एटीएम मशीनची दैनावस्था जनतेला पाहायला मिळत आहे.

 

 

अध्यक्ष मॅडमनी ह्या कडे लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. याच प्रभागात राहून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष पणा केले आहेत. मागे पण दोन व्यक्तीच्या पाण्यामध्ये मध्ये जंतू सापडले तरी पण मॅडम थातूरमातूर इथे सुधारणा करून तिथे स्वच्छता केली. पण आज पुन्हा या त्याच्यामध्ये यामध्ये जनतेच्या आरोग्याचा मुख्य हेतू हे नगरपरिषदेच्या वाटेन दुर्लक्ष पनाचा निघालात . कर्मचारी नेमला तो कोणत्या कामाचा आहे . आणि अंकुश आडे यांच्या पाण्यातून आज जंतू निघाले याआधी सुधा यांचं फिल्टर पाण्यातून दोन व्यक्तीच्या पाण्यातून जंतू निघाले तेव्हा येथील फिल्टर साफ करण्यात आले.पण ह्याची स्वच्छता होत नसेल तर जनतेच्या आरोग्याला खूप मोठा धोका पोहोचेल.

 

 

जर या फिल्टर प्लॅन ची स्वच्छता त्वरित केली नाही तर येथील स्थानिक लोकांनी नगर परिषदेवर मोर्चा नेण्याची तयारी दर्शवली आहे. हा प्रकार वारंवार दिसून येत आहे तरीपण नगरपरिषद चे लक्ष नाही. प्रभाग क्रमांक 1 मधील जनता यामध्ये पाणी पिण्यासाठी आपला उपभोग करतो प्लेन ही चांगल्या प्रकारे लावल्या गेली पण मुख्य म्हणजे यामध्ये स्वच्छता नसल्यामुळे या जंतू पडलेले आहेत यात नगर परिषद चे मुख्य लक्ष देऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि जे या एटीएम ची दिनांक 13 /8 /2021 ला तोडफोड केली त्यांची तक्रार सुध्दा दालल करण्यांत आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here