मँजिक बस इंडिया फांऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा
विविध पैलूंवर प्रकाश टाकत केली युवकांमध्ये जनजागृती
गडचिरोली, दि. १४ ऑगस्ट : १२ ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच युवा दिनाचे औचित्य साधून चामोर्शी तालुक्यात मँजीक बस इंडिया फांऊंडेशन मार्फत कुनघाडा ( रै.), नवेगाव, भेडाळा, सोनापूर, कुरुड, मुरखडा(माल), फोकरुंडी, घारगाव इत्यादी गावात युवकांमध्ये युवकांशी निगडीत विशिष्ट पैलूवर चर्चा घडवून विविध स्पर्धाचा आयोजन करून आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी चामोर्शी तालुका समन्वयक योगिता सातपुते यांच्या मार्गदर्शनात वसंत पोटे, रोशन तिवाडे, कु .झीनत सैय्यद, सोनी शिवूरकर, प्रफुल निरुड्वार इत्यादी युवा मार्गदर्शकानी कार्यक्रम राबविले. युवा दिनाच्या निमित्याने कार्यक्रम आयोजित करण्याची चामोर्शी तालुक्यात पहिलीच वेळ असल्याने गावातील वातावरण एकदम प्रफुलीत होते. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच गावातील सरपंच, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक शिक्षिका, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांच्या समवेत इतर मान्यवर उपस्थित राहिल्याने वातावरण हर्ष उल्हासाचे होते. सर्वाची नजरा आयोजित कार्यक्रमाकडे लागल्या होत्या.
सुरवातीलाच मँजीक बस इंडिया फांऊंडेशनच्या स्थानिक युवा मार्गदर्शकामार्फत प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, आरोग्य मार्गदर्शन तसेच इतर क्रियाशील असण्याची स्थिती बाबत जसे की क्षमता आणि उणिवा इत्यादीची माहिती अद्यावत करीत मार्गदर्शन झालेल्या विषयावर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या स्पर्धकाना बक्षिस देण्यात येवून युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. मँजीक बस इंडिया फाऊंडेशनच्या तालुका समन्वयक योगिता सातपुते यांनी केले युवाना मार्गदर्शन.
योगिता सातपुते यांनी युवकाना मार्गदर्शन करताना एक युवा राष्टासाठी किती महत्त्वाचा घटक आहे हे पटवून देवून युवा हा राष्ट्राचा कणा असून युवा शक्तीच्या माध्यमातून जगभरात शांततेची स्थापना व्हावी हा या मागचा प्रमुख उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या या कार्यक्रमात माध्यमातून संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्षण, रोजगार, गरिबी, आरोग्य, पर्यावरण, सहभाग, जागतिकीकरण, युवक आणि संघर्ष, एचआयव्ही एड्स आदी १५ क्षेत्रांची निवड प्रामुख्याने केली आहे. त्यात युवकांना मिळणाऱ्या संधींची संख्या वाढविणे, त्यांची गुणवत्ता वाढविणे आणि त्या माध्यमातून समाजासाठी युवकांचे योगदान वाढविणे हाच प्रमुख उद्देश आहे.
युवक हा समाजात बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. युवकांना नागरिकांचे अधिकार, सामाजिक न्याय आणि विश्वशांतीच्या महत्त्वाबाबत जागरूक केले तर जगात विविध पातळ्यांवर असणारे संघर्ष, वाद कमी होऊ शकतील. अशा अनुकुल बदलासाठी युवावर्ग निश्चितपणे पुढे येईल. जनसामान्यांच्या प्रगतीसाठी जागतिक शांततेचे महत्त्व लक्षात घेता शांतता प्रस्थापित करण्यात युवकांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
कु. सैय्यद याच्या मार्गदर्शन आणि वक्तृत्वामुळे ठरल्या युवापिढीचे आयकान
प्रत्येक मनुष्याकडे जन्मजात कला असते ती कोणाच्या कलेतून कोणाला मार्ग मिळेल सांगता येत नाही असेच काहीसे झाले. निमित्य होते ते युवा दिनाचे आणि याच कार्यक्रमा मार्गदर्शन आणि वक्तृत्वामुळे ठरल्या युवापिढीचे आयकान. आजचा युवक ज्ञान आणि विज्ञानाच्या विश्वात वावरणारा आहे. मानवी मुल्ये आणि मानवी विकासाबाबत त्याला चांगली जाण आहे. विज्ञान – तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्याची क्षमता त्याच्यात आहे. या क्षमतेचा उपयोग तो जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी निश्चितपणे करू शकतो. जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने या भूमिकेबाबत चर्चा होणे आणि त्यादिशेने युवकांचा सहभाग वाढणे तेवढेच महत्त्वाचे आहे. सय्यद यांच्या मार्गदर्शन आणि वक्तृत्वामुळे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने युवा दिन खरच सार्थकी ठरल्याचे गावात चर्चा आहे. या कार्याक्रमाप्रसंगी गावातील सर्व नागरिक व तरूण-तरूणी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.