चुनाळा येथे २५६ जनावरांना लसीकरण

0
691

चुनाळा येथे २५६ जनावरांना लसीकरण

राजुरा : जनावरांवर येणाऱ्या साथीच्या रोगांवर आळा घालण्यासाठी पशु वैद्यकीय अधिकारी राजुरा यांनी (दि. १३) चुनाळा येथे शिबिर घेऊन शेतकऱ्यांच्या २५६ जनावरांना लसीकरण केले आहे.

 

 

साधारणतः ऑगस्ट, सप्तेंबर महिन्यात जनावरांवर घटसर्प, एकटांग्या, ई टी वि, इत्यादी रोगाची लागण होत असते, यामुळे शेतीच्या मशागतीकरिता आवश्यक असलेल्या बैलांना रोगाची लागण झाल्यास शेतकऱ्यांना शेतीची मशागत करणे कठीण असते अशावेळेस शेतकऱ्यांना पर्याय नसते, नाईलाजास्तव वेळेवर उपचार न झाल्यास जनावरांचा मृत्यू होत असतो. यावर आला घालण्यासाठी पशु वैद्यकीय अधिकारी राजुरा यांनी चुनाळा येथे शिबीराचे आयोजन करून एका दिवशी तब्बल २५६ जनावरांना लसीकरण करण्यात आले.

 

 

यावेळी प्रभारी पशुधन अधिकारी शंकरराव बेलसने, परिचर मनीष पाटणकर, शंकर वांढरे, चुनालाचे सारपंचज बाळनाथ वडस्कर व ग्रामपंचायत पदाधिकारी तथा गावातील शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here