मुंगोलीचे पुनर्वसन अडकले मुल्यांकनात
वणी (यवतमाळ), मनोज नवले
तालुक्यातील मौजा मुंगोली गावाचे पुनर्वसन २०१७ पासुन फक्त मुल्यांकनात अडकले असुन मूल्यांकनाचे प्रलंबित असलेले काम तात्काळ करुन देण्याची मागणी मुंगोली गावचें माजी सरपंच तथा उपसरपंच अँड,रूपेश गुणवंत ठाकरे यांनी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग वणी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुंगोली गांवाचे पुनर्वसन वेकोली वणी क्षेत्राच्या मुंगोली निर्गुडा डिप विस्तारीकरण प्रकल्पाअंतर्गत येत असुन मुंगोली गावातील विहीरी,घरे,बोरवेल व फेनसिंग ईत्यादी बांधकामांचे मुल्यांकन करण्यासाठी सार्वजनीक बांधकाम विभाग पांढरकवडा यांनी दि.१ सप्टेंबर २०१७ रोजी एका आदेशाद्वारे १० कर्मचाऱ्यांची नियुक्ति केली होती. परंतु नियुक्त करण्यात आलेल्या १० कर्मचाऱ्यांमधील ७ लोकांची बदली झाल्यामुळे मुल्यांकनाचे काम रखडले होते.त्यानंतर पुन्हा पत्र व्यवहार करुन उपसरपंच अँड.रूपेश गुणवंत ठाकरे यांनी अतिरीक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ति करुन तात्काळ मुल्यांकन करुन देण्याची मागणी केली होती.
त्या मागणीची दखल घेऊन उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वणी यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा यांना दि.२६ जुलै २०२१ ला एक पत्र पाठवुन मुंगोली गावातील विहीरी,घरे, बोरवेल व फेनसिंग ईत्यादी बांधकामांचे मुल्यांकन तात्काळ करुन देण्यासाठी अतिरीक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ति करुन सुधारीत आदेश काढण्याची मागणी केली होती.
त्या मागणीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा यांनी अवघ्या तीन दिवसातच म्हणजे दि.२९ जुलै २०२१ रोजी वेकोली वणी क्षेत्राच्या मुंगोली निर्गुडा डिप ओपन कास्ट परियोजनेसाठी अधिग्रहीत करणाऱ्या जमीनीवरील विहिरी, घरे, बोरवेल व फेनसिंग आणि अन्य बांधकामाचे मुल्यांकन करण्यासाठी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम वणीचे व्ही.टी. परळीकर यांची चमु प्रमुख म्हणून तर त्यांच्या चमुमध्ये ९ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. परंतु अजुन पर्यंत मुल्यांकनाचे काम सुरु करण्यात न आल्याने मुल्यांकनाचे काम तात्काळ सुरु करण्याची मागणी उपसरपंच अँड.रूपेश गुनवंत ठाकरे यांनी दि.१० ऑगस्टला उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वणी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.