मारेगावच्या मिनी बसस्थानंकाचा प्रश्न मार्गावर बस निवाऱ्याचा प्रश्न घेवुन काँग्रेस, जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात

0
676

मारेगावच्या मिनी बसस्थानंकाचा प्रश्न मार्गावर बस निवाऱ्याचा प्रश्न घेवुन काँग्रेस, जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात

मनोज नवले वणी:-अनेक वर्षा पासून प्रलंबित असलेल्या मारेगाव येथील मिनी बस स्थानकाचा प्रश्न घेवुन काँग्रेस चे माजी आमदार वामनराव कासावर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी काँग्रेस च्या शिष्टमंडळानी जिल्हाधिकारी मा.अमोल येडगे यांच्या सोबत झालेल्या चर्चे आता खऱ्या अर्थाने मारेगावच्या बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लागल्याच्या मार्गावर असल्याने काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रमण डोये यांच्या कार्याला यश मिळत संकेत दिसत आहे.

सण 2019 मध्ये महामार्ग लगत शासकीय क्वार्टर च्या हद्दीत असलेले महसूल विभागाची गट क्र.6 मधील 2740 चौ.फूट जागा ही खनिज विकास निधीच्या माध्यमातून 71.24 लक्ष रुपयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नावे करण्यात आली.आत लवकरच शहरात बस निवाऱ्या निर्माण होईल या आशेने तालुका वासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटून बस स्थानकाचा प्रश्न हा मात्र वाऱ्यावरच लटकत होता.कारण बस निवाऱ्याच्या जागेचा प्रश्न मिटला होता.परंतु बांधकामास कुठलाही निधी नसल्याने मिनी बस स्थानक होवु शकले नाही.मात्र यावर लोकप्रतिनिधी सह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पुन्हा मरेगावच्या बस स्थानकाचा प्रश्न राम भरोसे होता.

मात्र बस स्थानक अभावी विध्यार्थी सह कर्मचारी महिलांची व प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.उन्हाळा पावसाळ्यात प्रवाशांना महामार्गाच्या लगत असलेल्या पानटपरी व आदी दुकानांचा आसरा घेऊन उभे राहावे लागत होते.यात महिला वर्गांची कुचंबणा होत होती.बस स्थानकासाठी अनेक राजकीय पक्षांनी निवेदने दिली खासकरून भारतीय कम्युनिस्ट पार्टी च्या वतीने तर वेळोवेळी आंदोलन केले प्रशासन व लोकप्रतिनिधी च्या वतीने आश्वासन सुद्धा देण्यात आले मात्र बस स्थानकाच्या जागेचा प्रश्न मिटला होता मात्र बांधकामासाठी पुरेसा कुठलाही निधी उपलब्ध नसल्याचे बोलल्या जात होते.

गेल्या दोन वर्षा पासून बस स्थानकाचा प्रश्न प्रशासन दरबारी रेंगाळत होता.दरम्यान काँग्रेस पक्षाच्या वतीने हा प्रश्न पुन्हा धरून बस स्थानकाच्या मागणीसाठी खासदार बाळू भाऊ उर्फ सुरेश धानोरकर व जिल्हाधिकारी मा.अमोल येडगे यांच्या दरबारी जावुन निवेदन देण्यात आले.यावेळी खासदार बाळू भाऊ धानोरकर यांनी लवकरच निधी उपलब्ध करून बांधकामास सुरवात करू असे आश्वासन दिले.

तालुक्यातील स्टोन क्रेशर,रेती घाट आदी गौण खनिजा पासून शासनाला मिळणाऱ्या मोबदल्यातून मारेगावच्या बस निवाऱ्याच्या बांधकामास हात भार लागू शकते असाही सवाल काँग्रेस नी निवेदनातून उपस्थित केला.तसेच जिल्हाधिकारी मा. अमोल येडगे यांच्या सोबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केलेल्या चर्चा नंतर बस स्थानकाच्या बांधकामास खनिज विकास निधीतुन लवकरच मिनी बस स्थानकासाठी हात भार लागण्याची शक्यता वर्तवील्या जात आहे.

निवेदन देते वेळी काँग्रेस चे जेष्ठ नेते तथा माजी आमदार वामनराव कासावर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद पाटील ठाकरे, जिल्हा सरचिटणीस रमण डोये,जिल्हा सचिव तुळशीराम कुमरे,तालुका अध्यक्ष मारोती गौरकार,उपाध्यक्ष युसूफ शेख, उपस्थित होते.

रमण डोये करत आहे बस स्थानकासाठी सतत पाठपुरावा

” काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस रमण डोये यांनी मारेगाव येथील मिनी बस स्थानकाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षा पासून शासन दरबारी रेटून धरला आहे.त्यांनी स्वता मुबंई येथे मुख्य कार्यालय वाहतूक भवन व तसेच परिवहनमंत्री दिवाकर रावते सह आदी मंत्र्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली.दरम्यान रमण डोये यांच्या सततच्या पाठ पुराव्यामुळे तेव्हा मिनी बस स्थानकाच्या जागेचा प्रश्न मिटला होता.आता तर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून व सोबत झालेल्या चर्चेतून आता खऱ्या अर्थाने बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा जनते कडून व्यक्त केली जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here