शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय चामोर्शी येथे ग्रंथालय दिन साजरा करण्यात आला
चामोर्शी:-गडचिरोली✍️सुखसागर झाडे.
आज दिनांक १२ऑगष्ट रोज गुरूवार ला डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत स्थानिक चामोर्शी येथील शरदचंद्र पवार कला महीला महाविद्यालयात कोविड 19 नियमांचे तंतोतंत पालन करीत अत्यंत साध्या पद्धतीने डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस दिप प्रज्वलन व पुष्पगुच्छ बहाल करुन प्रतिमेस मानवंदना देत मोठ्या उत्साहात जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमा प्रसंगी शरदचंद्र कला महिला महाविद्यालयाचे ग्रंथपाल निनाद देठेकर यांनी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला. व त्यांचे मौल्यवान विचार प्रत्येकांनी जिवनात अंगिकारावे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बि.व्ही धोटे.प्रमुख अतिथी म्हणून प्रा.प्रविण मडावी सर, प्रा. सूखसागर झाडे, प्रा.निनांद देठेकर शिक्षकेतर कर्मचारी वृंद -श्री.सुनील आभारे, नितेश पोरटे, सौरभ सहारे, भावना सुर, संजय गडकर, आशिष मेश्राम, भावना चांदेकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.