राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील खड्ड्यामुळे ट्रक पलटी

0
767

राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील खड्ड्यामुळे ट्रक पलटी

मनोज नवले :-वणी

: महामार्गावरील खड्ड्यांमुळे दैनंदिन अपघाताची मालीकाच सुरू, महामार्ग प्रधिकरणाचे दुर्लक्ष

केळापूर तालुक्यातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असुन या खड्ड्यामुळे आज रोजी हैद्राबाद हून मथुरा कडे  ट्रक क्रमांक एच आर ५५ एए ७४५१ हा ट्रक जात असताना पिंपरी रोड समोरील खड्ड्यात आदळल्याने पलटी मारल्याची घटना घडली सुदैवाने या घटनेत कुणाचीही जिवतहानी झाली नसुन ट्रक चालक किरकोळ जखमी असल्याने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले आहे. ट्रक क्लीनर सुजन गणेश मालथुन वय ४५ रा.झांसी उत्तर प्रदेश हा सुध्दा किरकोळ जखमी आहे. सदर ट्रक मधे सुरकन भरून हैद्राबाद कडून मथुरा ला जात असताना केळापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील पिंपरी रोड समोर खड्ड्यात आदळल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. घटनेची माहीती मिळताच पांढरकवडा पोलीसांनी घटनास्थळ गाठले यावेळी महामार्गावर ट्रक पलटल्याने मोठी वाहतूक खोळंबली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here