चंद्रपूर जिल्हा खनिकर्म विभाग पथकाच्या कारवाया, दाेन अवैध रेतीचे ट्रैक्टर जप्त
चंद्रपूर, किरण घाटे (वि.प्र.) : चंद्रपूर जिल्ह्यात अंदाजे दिडशे ते दाेनशे रेती घाट आहे .त्या पैकी काही रेती घाटांचा शासनाच्या वतीने लिलाव करण्यांत आला तर काही रेती घाट लिलाव हाेणे शिल्लक आहे .याच संधीचा फायदा घेत काही रेती तस्करांनी( अधिकारी व कर्मचा-यांची नजर चुकवून ) दिवस रात्र वाहनांव्दारे अवैध रेती नेण्याचा सपाटा लावला हाेता .परंतु चंद्रपूर जिल्हा खनिकर्म विभागाच्या एका पथकाने गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूरच्या अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर तथा जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांचे मार्ग दर्शनाखाली रेतीचे अवैध दाेन वाहने दंडात्मक कारवायांसाठी नुकतेच ताब्यात घेतले असल्याचे व्रूत्त आहे.
ही कारवाई खनिज निरीक्षक बंडू वरखेडे , दिलीप माेडके ,व अल्का खेडकर यांनी केली .दरम्यान एम . एच. ३४ एपी १७३८या वाहनास इरई झरपट संगमावर पकडण्यांत आले. सदरहु वाहन दिलीप बनकर यांचे मालकीचे आहे तरं दुसरे एक वाहन(गाड़ी नंबर नसलेले ) विजय भाेंगरे रा.नांदगांव पाेडे यांचे मालकीचे असुन त्या वाहनास आरवट रस्त्यावर भर सकाळी पकडण्यांत आले .या दाेन्ही कारवायांमुळे अवैध रेती वाहतुक करणा-यांत एकच खळबळ उडाली आहे .