कोरोना काळात बसस्थानक परिसर घाणीच्या विळख्यातच…
वणी, मनोज नवले
वणी बसस्थानक मध्यवर्ती असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यात अजून डुकरांची शहरातील वाढती संख्या पैकी काही डुकरे इथेही असते. चिखल होऊन त्यात प्लास्टिक, हॉटेल व्यावसायिक यांच्या कडुन फेकण्यात येणारे घाण पाणी व अन्नयुक्त पाणी मुळे डबके तयार होऊन दुर्गंधी येत असते. त्यात डुकरांचा स्वैराचार असतो. त्यात भरीस भर अनेक जन तेथे लघु शंकेस जात असतात त्यामुळे मानवी शरीराला घातक अशी दुर्गंधी सुटत असते.
कोरोना परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक परिसर स्वच्छ राहणे अपेक्षित असते. पण बस स्थानक प्रशासन सुस्त झालेले दिसते. बस स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन लाखो रुपयांचा वार्षिक कंत्राट देत असते. पण स्वच्छतेच्या नावाने नेहमीच बोंम्बा बोंब असते. कंत्राटदार स्वच्छता ठेवण्यात असमर्थ ठरते तरी बस स्थानक प्रशासन गप्प आहे. यावर नागरिक व प्रवाश्यांनी आश्चर्य व्यक्त केले. “अळी मिळी गुपचिळी” यां भूमिकेत प्रशासन असल्याचे दिसते. यावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी निसर्ग मित्र मंडळ वणीचे अध्यक्ष शम्स सिद्दीकी व संघटक लोकसेवक अमित उपाध्ये यांनी केली आहे.