नारंड्यात शिष्टाचार डावलून ग्राम पंचायतीचे लोकार्पण

0
727

नारंड्यात शिष्टाचार डावलून ग्राम पंचायतीचे लोकार्पण

पत्रकार परिषद ; सरपंचावर शिस्तभंगाची कारवाई करा

कोरपना, प्रवीण मेश्राम

 

तालुक्यातील नारडा येथील नवीन ग्रामपंचायतीचा लोकार्पण सोहळा सरपंचांनी शिष्टाचाराचा नियम भंग करून केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या विना सुरेश मालेकर व पंचायत समिती सदस्य श्याम रणदिवे यांनी कोरपना येथे आयोजित पत्रपरिषदेत केला.

 

पाच ऑगस्ट रोजी नारंडा येथे सरपंच सुपुत्राच्या वाढदिवसी नवीन ग्रामपंचायत इमारतीचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सरपंच, ग्रामपंचायत नारडा यांनी केले होते. मात्र या लोकार्पण सोहळयाला स्थानिक विरोधी ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना हेतूपुरस्पर निमंत्रित करण्यात आले नाही. हा प्रकार नियमानुसार शिष्टाचाराचे पालन न करता हुकूमशाही प्रणालीला वाव देणारा आहे. सदर कार्यक्रम केवळ सत्ताधारी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा होता काय ? असा सवाल उपस्थित करत. या प्रकाराचा निषेध करून सरपंचावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्र परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली.

सरपंचाच्या विशेषाधिकारातून सदर ग्रामपंचायतीचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य यांच्याकडून सुद्धा अनेक कार्यक्रमात नियमानुसार आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती व आम्हाला निमंत्रित करून पाचारण केले जात नाही. त्यामुळे आम्ही त्यांना निमंत्रित केले नाही.
त्यांच्याकडूनही या बाबीचे पालन झाल्यास आम्ही त्यांना निमंत्रित करू…!
अनुताई ताजणे
सरपंच ग्रामपंचायत नारंडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here