प्रहार तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न, सदस्य नोंदणी मोहिमेला सुरवात

0
745

प्रहार तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न, सदस्य नोंदणी मोहिमेला सुरवात

कोरपना (चंद्रपूर), प्रवीण मेश्राम (११ ऑगस्ट)

 

प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे काल पक्षाच्या आदेशाने दिव्यांग ज्येष्ठ नागरिक व बालकांचे मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप करण्यात आले आरोग्य तपासणी साठी अर्थ फॉउंडेशनचे संस्थापक डॉ कुलभूषण मोरे व डॉ आरती पानघाटे यांनी रुग्णाची तपासणी करून रुग्णांना औषधी देण्यात आले.

 

 

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रत सप्ताह कार्यक्रम राबवून प्रहार सदस्य नोंदणी मोहीमला सुरुवात झाली. सोबत या कार्यक्रमात बच्चूभाऊ म्हणाले लोकांची सेवा हा आपला पाया असून तो अधिक मजबूत झाला तरच प्रहार मजबूत होईल . त्यासाठी ९ ऑगस्ट पासून सुरू होणारी राज्यव्यापी सदस्य नोंदणी मोहीम मोठा जोर लावत यशस्वी करा . आजवर काम किती केले यापेक्षा प्रहारशी किती लोक जोडले यावरून मोजमाप होणार आहे . लोकांच्या प्रश्नावर आंदोलने हे आपले महत्वाचे अंग आहे त्याची आठवण ठेऊन सत्ता कोणाचीही असो आपली नाळ कायम गरीब , सामान्य माणसाशी ठेवा असे उदगार कार्यकर्त्यांना अकोला येथे मार्गदर्शन करताना केले.

 

त्याचाच एक अंग म्हणून कोरपना जिवती तालुक्यात विविध कार्यक्रम राबवून प्रहार जनशक्ती पक्षाची सदस्य नोंदणी मोहिमेला सुर्वात झाली.

 

 

गडचांदुर येथील बंगाली कॅम्प एरियात आरोग्य तपासणी करण्यात आली आरोग्य तपासणीत ६६ लोकांची तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आले यात डॉ कुलभूषण मोरे व डॉ आरती पानघाटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्या नंतर सभासद नोंदणीला सुर्वात झाली या प्रसंगी प्रहार संघटनेचे सतिश बिडकर,अरविंद वाघमारे, पंकज माणूसमारे, अनुप राखुंडे, नितेश कोडपे, आमने, सूरज बार, मिथुन घुले, महादेव बिस्वास, हलदार, सत्वशिला घुले, कमला घुले, शोभाबाई अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here