बेंबाळ येथील मंडळ अधिकारी महादेव कन्नाके अखेर निलंबित ; एका राजकिय नेत्या कडुन मागितली हाेती शेतजमीन फेरफार प्रकरणात लाच!

0
927

बेंबाळ येथील मंडळ अधिकारी महादेव कन्नाके अखेर निलंबित ; एका राजकिय नेत्या कडुन मागितली हाेती शेतजमीन फेरफार प्रकरणात लाच!

चंद्रपूर, किरण घाटे – विशेष प्रतिनिधी : कायद्याने लाच घेणे व देणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे याची पुरेपूर जाणीव असतांना सुध्दा मूल तालुक्यातील बेंबाळ येथील कार्यरत लाचखाेर मंडळ अधिकारी महादेव कन्नाके यांनी एका शेतजमीन फेरफार प्रकरणात काँग्रेसचे यूवा नेता , मूल क्रूषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा भेजगांव येथील विद्यमान सरपंच अखिलेश गांगरेड्डीवार यांना तब्बल तीन हजार रुपयांची लाच मागितली हाेती .

 

 

सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी सदैव लढणां-या या यूवा नेत्यास मंडळ अधिका-यांस लाच देण्यांची मुळीच इच्छा मनात नव्हती .ग्रामीण भागातील प्रतिष्ठीत शेतकरी असणा-या गांगरेड्डीवार यांनी थेट चंद्रपूर गाठून या लाचखाेर मंडळ अधिका-याची रितसर तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे नाेंदविली .संबंधित विभागाच्या अधिका-यांनी वेळेचा कुठलाही विलंब न लावता सापळा रचला ! २१जून राेजी जागतिक याेगादिनाच्या दिवशी लाचखाेर मंडळ अधिकारी कन्नाके यांस मूल तहसील कार्यालयाच्या बाहेर परिसरातील मानकर यांचे चहा टपरीवर सदरहु शेतक-यांकडुन तीन हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले .

 

 

या घटने नंतर काही दिवसातच चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपला लेखी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला त्या अनुषंगाने (बेंबाळ मंडळाचा) मंडळ अधिकारी महादेव कन्नाके यांस जिल्हा महसूल कार्यालयाने काल सोमवार दि.९ आँगष्टला एका आदेशान्वये निलंबित केले असल्याचे खात्री लायक व्रूत्त आहे .कन्नाके हे या पूर्वी तलाठी हाेते गेल्या दाेन ते अडीच वर्षापूर्वी त्यांना मंडळ अधिकारी म्हणून पदाेन्नती मिळाली याच कालावधीत त्यांना जिवती तालुका मिळाला हाेता .

 

 

परंतु त्यांनी अथक प्रयत्न केले व विनंती नुसार मुल तालुका मिळविण्यांत ते यशस्वी झाले पहिल्याच मंडळात कार्यरत असतांना कन्नाके लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले .त्यांचे मुळ गांव गाेंडपिपरी तालुक्यातील असून सध्या ते मुल मध्ये वास्तव्य करीत करीत आहे. निलंबित कालावधीत त्यांचे मुख्यालय सावली तहसील कार्यालय ठेवण्यांत आले असल्याचे समजते .दरम्यान या पूर्वीच लाच लुचपत खात्याच्या जाळ्यात अडकलेल्या नंदाेरीचा बहुचर्चित मंडळ अधिकारी प्रशांत बैस यांस जिल्हा प्रशासनाने निलंबित करुन त्यांचे मुख्यालय गाेंडपिपरी तहसील कार्यालय ठेवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here