संघटनेच्या माध्यमातून बल्लारपूर वासीयांची सेवा करण्याचा मानस – आ. किशोर जोरगेवार

0
732

संघटनेच्या माध्यमातून बल्लारपूर वासीयांची सेवा करण्याचा मानस – आ. किशोर जोरगेवार

बल्लारपूरातील शेकडो युवकांचा यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश

यंग चांदा ब्रिगेडच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यांमूळे संस्थेचा जिल्हाभरात विस्तार होत असतांना ही संस्था पद उपभोगण्यासाठी नसून सेवा करण्यासाठी आहे याची जाणीव नवनियुक्त पदाधिका-यांनी व सदस्यांनी ठेवण्याची गरज असुन बल्लारपूरात स्थापन झालेल्या या यंग चांदा ब्रिगेडच्या शाखेच्या माध्यमातून येथील नागरिकांची सेवा करण्याचा आपला मानस असल्याचे प्रतिपादन यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक, अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

काल आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमूख उपस्थितीत बल्लारपूरातील शेकडो युवकांनी यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश घेतला. या करिता बल्लारपुरातील भगतसिंह वार्डात स्नेहमिलन व पक्षप्रेवश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक पंकज गुप्ता, चंदू ठाकूर, रवी शेंगर, गुलाब पटले, देशपांडे, आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, बल्लारपूर वासीयांचे माझ्यावर नेहमीच प्रेम राहले आहे. आज हा भव्य सत्कार करुन तुम्ही ते पून्हा एकदा व्यक्त केले आहे. आपण आज दिलेला हा सन्मान आजिवन माझ्या स्मरणात राहणार आहे. बल्लारपूर शहर जिल्हातील प्रमुख शहरांपैकी एक आहे. असे असले तरी येथे अनेक प्रश्न आहेत. येथील वाढती गुन्हेगारी चिंतेची आणि समाजासाठी घातक बाब आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून बल्लारपूर शहरातील नागरिकांच्या व्यथा, वेदना, दुख माझ्या पर्यंत पोहचविण्याचे काम येथील नवनियुक्त पदाधिका-यांनी करावे. यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून काम करत असतांना शेवटच्या गरजू पर्यंत आपली मदत पोहचेल असे नियोजन करावे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम राबविण्यात यावे. असे आवाहन यावेळी त्यांनी केले. सामाजिक क्षेत्राची आवड असलले बल्लारपूरातील अनेक नागरिक यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक आहेत. त्यामूळे येत्या काळात येथे आणखी काही प्रवेशाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे. येथील संघटन विस्तारीत होताच अधिक गरजुंपर्यत पोहचून त्यांना मदत करणे सहज शक्य होणार आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी वाढणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. अधिकाधिक नागरिकांपर्यत पोहचून संघटनेचे विचार त्यांच्या पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी या सर्व नवनियुक्त पदाधिका-यांवर असून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून गरजूंना मदतीचा हात या यंग चांदा ब्रिगेडच्या शाखेतर्फे दिला जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. या कार्यक्रामात सतीश केसकर, दिनेश केसकर, रमेश यादव, यांच्या नेतृत्वात शेकडो युवकांनी यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश घेतला. यावेळी आ. जोरगेवार यांनी नवनियुक्त पदाधिका-यांच्या गळ्यात यंग चांदा ब्रिगेडचा दुप्पटा टाकुन त्यांचे संघटनेत स्वागत केले. शांती गिरमिलकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यात महिलां व ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here