” चार एक्के दे धक्के” आंदोलनाने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधले –

0
910

” चार एक्के दे धक्के” आंदोलनाने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधले –

रैली बघण्यांस रस्त्यांच्या दुतर्फा लाेकांची गर्दी ,

पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त

चंद्रपूर -किरण घाटे वि.प्र.चंद्रपूर जिल्ह्यातचं नव्हे तरं अख्ख्या विदर्भात-सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणां-या चंद्रपूर शहरातील यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने काल सोमवार दि. ९आँगष्टला दुपारी १वाजता महानगर पालिका सत्ताधिका-यांनी केलेल्या घाेटाळ्यांचा संदर्भात चार एक्के दे धक्के हे अभिनव आंदोलन करण्यांत आले. या आंदाेलनाच्या निमित्ताने शहरातील स्थानिक यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालया जवळुन एक रैली काढण्यांत आली.ती रैली नंतर स्थानिक गांधी चाैकात पाेहचली या लक्षवेधक रैलीचे नेत्रूत्व खुद्द चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे अपक्ष आमदार तथा चांदा यंग ब्रिगेडचे सर्वेसर्वा किशाेर जाेरगेवार यांनी केले .यंग चांदा ब्रिगेडचे शेकडाें कार्यकर्ते “चार एक्के दे धक्के” या आंदाेलनात स्वयंस्फुर्तिने सहभागी झाले हाेते . महिला कार्यकर्त्यांसह तरुणींची उल्लेखनिय उपस्थिती या आंदाेलनात हाेती . शहराच्या मुख्य मार्गावर असलेल्या मनपा कार्यालया समाेर झालेल्या एका सभेत आमदार किशाेर जाेरगेवार यांनी रैलीला संबाेधित केले .२००युनिट बील माफीची आपली लढाई अजून संपली नाही ही लढाई अशीच सुरु राहील .या साठी आपले सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले या बाबत आपण विधानसभेत ही मागणी रेटुन धरली आहे.दरम्यान चार एक्क्याचा देखिल खुलासा करण्यांस ते विसरले नाही. या वेळी यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटीका वंदनाताई हातगांवकर यांचे ही भाषण झाले त्या म्हणाल्या की यंग चांदा ब्रिगेड ही संघटना राजकीय संघटना नसुन ती एक सामाजिक संघटना आहे . सर्व सामान्य जनतेचे प्रश्न साेडविण्यासाठी ती सतत लढत असते .आजचे आंदोलन हा त्याचाच एक भाग असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणातुन या वेळी केला .आजचे आंदोलन हे लक्षवेधक असेच हाेते .निघालेली रैली बघण्यांसाठी रस्त्यांच्या दुतर्फा बघ्यांची गर्दी झाली हाेती या आंदाेलनाच्या पाश्व्रभूमिवर शहरातील मुख्य मार्गावर पाेलिसांचा चाैख बंदोबस्त ठेवण्यांत आला हाेता . मनपा कार्यालया समाेर दंगा पथक तैनात करण्यांत आले हाेते . दरम्यान शहरात कायदा शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पाेलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून हाेते .या आंदाेलना पुर्वि याच दिवशी भाजपाच्या वतीने आमदार किशाेर जाेरगेवार यांचे विरुध्द आंदोलन छेडण्यांत आले हाेते .कालचा दिवस हा आंदाेलनाचा दिवस ठरला हाेता .यंग चांदा ब्रिगेडच्या आंदाेलनाची उत्सुकता चंद्रपूरकरांना लागुन हाेती त्या मुळे शहराच्या काही भागात बघ्यांची गर्दी दिसून आली .कालच्या दाेन्ही आंदाेलनामुळे पाेलिसांची चांगलीच दमछाक झाली .चार एक्के दे धक्के आंदोलन यशस्वि करण्यांसाठी यंग चांदा ब्रिगेडचे जितेश कुळमेळे , अजय दुर्गे , बलराम डाेडानी , कलाकार मल्लारप , पकंज गुप्ता आदींसह अनेक कार्यकर्यांनी अथक परिश्रम घेतले हाेते .कालच्या चार एक्के दे धक्के या अभिनव आंदाेलनाची चर्चा दिवसभर शहरात सुरु हाेती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here