प्रथ्रोट पोलीस वसाहत ची दूर्दशा
प्रस्ताव बेदखल ; शतकोत्तर ईमारत पालकमंत्री कडे मांडल्या व्यथा
प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे
अमरावती (प्रथ्रोट) : इ.स.१८१५ मध्ये इंग्रजांच्या काळात चार एकर जमीन वर प्रथ्रोट पोलिस ठाण्यात चि वास्तू बांधण्यात आली होती. या इमारती चे रुप केव्हा बदलणार याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
प्रथ्रोट पोलिस ठाण्याच्या वास्तूत कर्मचारी निवास आहेत. या दोन्ही वास्तू १०५ वर्षाच्या झाल्या आहेत. गतवर्षी ठाण्याच्या इमारती करिता शासन तर्फे निधी मिळाला.बांधकाम होऊन त्या इमारत मध्ये तीन महिन्या पासून पोलिस कारभाराला सुरुवात ही झाली.मात्र इंग्रजाचा काळातील १८ कर्मचारी निवासाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे भिंतींना तडे गेले, तर काही भिती खचल्या आहे.
छतावरील टिनाला झरे पडले आहे. पाऊसाळ्यात हमखास पाणी गळते.या कर्मचारी निवासाची बांधकाम विभागतर्फे अधूनमधून तात्पुरती डागडुजी करण्यात येत होती.अशा झालेल्या अवस्थेत क्वार्टर मध्ये पोलिस कुटुंब जीव धोक्यात टाकून राहतात.
पोलीस कर्मचारी चा कुटुंब साठी सुरुक्षीत निवास नसल्याची शोकांतिका प्रथ्रोट पोलिस ठाण्यात बरेच वर्षांपासून आहे. प्रथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३८ लहान मोठे खेडे आहेत.८०ते९० हजार लोकसंख्या ची सुरक्षेची जबाबदारी पाच बीटमधून बघितले जाते. कर्मचाऱ्यांची संख्या पाहता क्वार्टर ची संख्या देखील वाढवावी अशी मागणी पोलिस कुटुंबीयांकडून होत आहे.
पोलिस कर्मचारी हा महत्त्वाचा दिवा आहे. त्यांच्या वरच पोलीस प्रशासन चा कारभार चालतो. त्यांच्या निवारा व सुविधेचा विचार होणे गरजेचे आहे.
– प्रथ्रोट ठाणेदार, मनोज चौधरी