गडचिराेलीत साजरा झाला आदिवासी दिन -रक्तदान शिबिराचेही आयोजन !
चंद्रपूर, विदर्भ -किरण घाटे- ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाँइज फेडरेशन जिल्हा शाखा गडचिरोली तथा विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिवस गडचिराेली य़ेथील आरटीआय गोकुळ नगर बायपास रोड वरील नियोजित जागेवर थाटात साजरा करण्यात आला. या वेळी भरत येरमे अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाइज फेडरेशन यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला फरेंद्र कुतीरकर राज्य अध्यक्ष हलबा कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य, माधवराव गावळ, गुलाबराव मडावी नगरसेवक, सुरेश कीरंगे, अध्यक्ष गोंडवाना गोटुल समिती, पद्माकर मानकर माजी जिल्हा परिषद सदस्य,प्रकाश गेडाम भाजप महामंत्री,रंजना गेडाम, नगरसेविका, आनंद कंगाले श्रीमती जयश्री येरमे अध्यक्षनारीशक्ती संघटना व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ध्वजारोहणाचे सुत्रसंचालन अमर सिंग गेडाम यांनी केले. गोंडी गीतव्दारे सलामी देण्यात आली. त्यानंतर त्याच स्थळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरहु कार्यक्रमाचे उद्घाटक फरेन्द्र कुतीरकर यांनी केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भरत येरमे यांनी विभूषित केले हाेते यावेळी विविध मान्यवरांनी जागतिक आदिवासी दिवस व आदिवासींचे हक्क, अधिकार आणि आदिवासी संस्कृती या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले .याच कार्यक्रमांत साैंदर्य पुरस्कार विजेता मनीषा मडावी यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध संघटना व संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले. नारी शक्ती संघटनेद्वारे कार्यक्रम स्थळी नृत्य सादर करण्यात आले .आयाेजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधवराव गावळ यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सरचिटणीस सदानंद ताराम यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश्वर पदा ,ऋषी होळी ,मुकेश पदा अमरसिंग गेडाम, चंद्रकुमार उसेंडी, नामदेव उसेंडी ,वसंत कोरेटी ,सुरज मडावी व नारी शक्ती संघटनेच्या पदाधिका-यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमातील उपस्थितीतांचे आभार अमर सिंग गेडाम यांनी मानले . कार्यक्रम संपल्यानंतर सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .यात सदानंद ताराम अमरसिंग गेडाम
डबाजी पेंदाम ऋषी होळी, राजेश्वर पदा, सुरज मडावी, कृष्णा ताराम ,विनोद मडावी जगदीश मडावी, मनीषा मडावी रंजीता पेंदाम ,स्नेहल कोटनाके आदींनी सहभाग घेतला .