पूस नदीत आढळला मृतदेह
वणी (यवतमाळ), मनोज नवले
यवतमाळ जिल्ह्याचे पुसद शहरातील पुस नदी पात्रात एका ७२ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला मुकुंद खंडाळे असे या मृत व्यक्तीचे नाव असुन तो पुसद पासुन ५ कि मि अंतरावर असलेल्या वाळतुळ येथिल ते रहवासी आहे. गेल्या २ ते ३ दिवसा पासुन बेपत्ता होते.
रविवारी दुपारचे सुमारास नागरीकांना नदीपात्रात मृतदेह तरंगताना दिसला. नागरिकांनी पोलिसांना याचि माहिती दिली व पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असुन शवविच्छेदनासाठी पाठविले. पुसद शहर पोलिस स्टेशनचे ठानेदार दिनेशचद्र शुक्ला यांचे मार्गदर्शनात पुढील तपास सुरु आहे.