येत्या ९ आँगष्टला चंद्रपूरात “चार एक्के दे धक्के” आंदोलन हाेणारच…! यंग चांदा ब्रिगेडचा ठाम निर्णय
जनतेचा आवाज दाबण्यांचा मनपाचा प्रयत्न
चंद्रपूर, किरण घाटे विशेष प्रतिनिधी – चंद्रपूर जिल्ह्यातचं नव्हे तरं अख्ख्या विदर्भात-सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणां-या चंद्रपूर शहरातील यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने येत्या सोमवार दि. ९आँगष्टला दुपारी १वाजता महानगर पालिका सत्ताधिका-यांनी केलेल्या घाेटाळ्यांचा संदर्भात चार एक्के दे धक्के हे अभिनव आंदोलन हाेत आहे .या आंदाेलनाच्या निमित्ताने शहरातील विविध भागात आंदाेलनाचे फलक लावण्यांत आले आहे.
त्या आंदाेलनाचे फलक अनाधिक्रूत ठरवित मनपा हटविण्यांचा प्रयत्न करीत असुन मनपा महापाैर आपल्या पदाचा गैरवापर करीत आहे . एकप्रकारे जनतेचा हा आवाज दाबण्यांचा एक प्रयत्न असल्याचा स्पष्ट आराेप यंग चांदा ब्रिगेड (आदिवासी) आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे यांनी केला असून त्यांनी मनपा प्रशासनाचा निषेध देखिल आज (शनिवारला ) नाेंदविला आहे.
दरम्यान हे आंदोलन चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे अपक्ष आमदार तथा चांदा यंग ब्रिगेडचे सर्वेसर्वा किशाेर जाेरगेवार यांचे नेत्रूत्वाखाली स्थानिक गांधी चाैकातील मनपा कार्यालया समाेर (ठरलेल्या तारखेला) हाेणारच असल्याचे कुळमेथे यांनी या प्रतिनिधीशी भ्रमणध्वनी बाेलतांना सांगितले .यंग चांदा ब्रिगेडचे हजारों कार्यकर्ते “चार एक्के दे धक्के” या आंदाेलनात सहभागी हाेण्यांची शक्यता नाकारता येत नाही .महिला कार्यकर्त्यांसह तरुणी या आंदाेलनात स्वयंस्फुर्तीने सहभागी हाेणार असल्याचे समजते. विशेष उल्लेखनिय बाब अशी की या आंदाेलनाची बातमी सर्वप्रथम इम्पँक्ट -24 ने काल प्रकाशित केली हाेती .