खावटी अनुदान योजनेचा आदिवासी बांधवांनी लाभ घ्यावा
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली अंतर्गत खावटी अनुदान योजनेतून चामोर्शी येथे खावटी किट वाटपाचा शुभारंभ
चामोर्शी✍️सुखसागर झाडे गडचिरोली
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने खावटी अनुदान योजनेतंर्गत आदिवासी बांधवांना २ हजार रूपये अनुदान व जीवनावश्यक वस्तू देण्यात येत असून या योजनेचा आदिवासी बांधवांनी लाभ घ्यावा. असे आवाहन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी चामोर्शी येथे खावटी अनुदान योजनेंतर्गत राजमाता राजकुवर अनुदानित आश्रम शाळा चामोर्शी येथे आयोजित आदिवासी विकास प्रकल्प व आदिवासी विकास महामंडळ चे संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात लाभार्थ्यांना खावटी किट चे वाटप करतांना केले.
चामोर्शी तालुक्यात आजपासून या खावटी अनुदान योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात 4177 लोकांना खावटी अनुदान व किट वाटप करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.
या अनुदान योजना अंतर्गत तुर डाळ व दोन हजार रुपयांचे किराणा साहित्य वाटप करण्यात येत आहे आधीच सर्व लाभार्थी यांच्या थेट खात्यात दोन हजार रुपये वर्ग करण्यात आले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्पाचे तालुका समन्वयक संजय कन्नाके यांनी आव्हान केले आहे. यावेळी प्रामुख्याने मुख्याध्यापक यामावार
भटपल्लीवार भारतीय जनता पक्षाचे शैक्षणिक प्रकोष्ट जिल्हा संयोजक संतोष पडालवार व जयराम चलाख व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.