कुलरचा शॉक लागून अकरा वर्षीय बालकाचा मृत्यू

0
957

कुलरचा शॉक लागून अकरा वर्षीय बालकाचा मृत्यू

 

मनोज नवले, वणी : यवतमाळ जिल्ह्याचे झरी तालुक्यातील गणेशपूर येथील अकरा वर्षीय बालकाला कुलरचा शॉक लागून जागीच अंत झाला.

 

 

दि. 6 आगस्ट ला दुपारी तीन वाजताच्या सुमारास दिव्यांशु सुरेश बांदूरकर वय वर्ष (११) हा दुपारी जेवण करायला घरात आला व त्याने कुलर सुरू करताच कुलरचा शॉक लागला आणि क्षणात तो जागीच मृत्यूमुखी पडला. त्याची मोठी बहीण शाळेतून घरी आल्यावर दिव्यांश खाली मृत अवस्थेत पडून होता. घटनेच्या वेळी आई शेतामध्ये गेली होती व वडिलांचे पंचरच्या दुकानात होते. या घटनेने संपूर्ण कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चिमुकल्याचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here