गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

0
759

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

वणी:- यवतमाळ जिल्ह्याचे वणी तालुक्याचे नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ, मित्र मंडळ, जैताई देवस्थान व प्रेस वेलफेअर असोसिएशन, वनिता समाज तर्फे वणी शहरातून 10 वी व 12 वी मध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. नगर वाचनालयात दि. 6 ऑगस्टला घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार हे होते. सत्कारकर्ते म्हणून नागपूर येथील प्रसिद्ध लेखक, वक्ते डॉ. श्रीकांत गोडबोले व अतिथी म्हणून नागपूर येथील प्रकाश बापट उपस्थित होते.

 

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेगांव येथील गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यावाचस्पती डॉ. स्वानंद पुंड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर डॉ. श्रीकांत गोडबोले यांच्या साहित्यिक सेवेबद्दल व प्रकाश बापट यांनी नगर वाचनालयात 25 वर्षापर्यंत संचालक म्हणून केलेल्या कार्याबद्दल शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव सरपटवार यांनी 81 व्या वर्षात प्रवेश केल्या बद्दल त्यांचाही डॉ. गोडबोले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 

 

सर्वप्रथम संस्कृत भारती तर्फे घेण्यात आलेल्या राम रक्षा स्तोत्र पठण स्पर्धेत बक्षीस मिळविणाऱ्या 4 स्पर्धकांना माधव सरपटवार यांच्या तर्फे रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर दहाव्या वर्गात सर्वाधिक गुण मिळविणारे गौरांग श्रीवल्लभ सारमोकदम, मनस्वी दिलीप आस्कर, आर्या डहाळकर, पायल प्रशांत महाजन व इयत्ता बारावी मध्ये सर्वाधिक गुण मिळविणारे संकेत गजानन गहूकर, कृष्णा विलास ठोंबरे, आराध्य पुरुषोत्तम पिट्टलवार यांचा आयोजक संस्थांच्या वतीने गौरव करण्यात आला.  या प्रसंगी डॉ. स्वानंद पुंड यांच्या 61 व्या ग्रंथाचे प्रकाशन झाल्याप्रित्यर्थ माधव सरपटवार यांनी ग्रंथांची एकसष्टी झाली म्हणून या ग्रंथाचे लेखक डॉ. स्वानंद पुंड यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मित्र मंडळाचे सचिव राजाभाऊ पाथ्रडकर यांनी केले. आभार प्रदर्शन विदर्भ साहित्य संघाचे सचिव प्रा. अभिजित अणे यांनी केले. या प्रसंगी नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार, संचालक हरिहर भागवत, अनिल जयस्वाल, प्रेस वेलफेअरचे अध्यक्ष रवी बेलूरकर, सचिव तुषार अतकरे, विनोद ताजने, अशोक सोनटक्के, प्राचार्य प्रसाद खानझोड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद लोणारे, राम मेंगावार यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here